Ind vs Aus 2nd T20: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर पलटवार, रोहितची तुफान बॅटिंग, जाणून घ्या विजयाची कारणं
Ind vs Aus 2nd T20: 8 ओव्हरच्या मॅचमध्ये टीम इंडियाने अशी मारली बाजी. या खेळाडूंची विजयात महत्त्वाची भूमिका.
मुंबई: टीम इंडियाने शुक्रवारी दुसऱ्या T20 सामन्यात बाजी मारली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच झाली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून विजय मिळवला. तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे. पावसामुळे सामना सुरु व्हायला बराच विलंब झाला. अखेर अंपायर्सनी मैदानाची पाहणी करुन 8 ओव्हर्सची मॅच खेळवण्याचा निर्णय घेतला.
– प्रथम बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 8 ओव्ह्रर्समध्ये 90 धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी 91 धावांच लक्ष्य दिलं. टीम इंडियाने चार चेंडू राखून विजय मिळवला. जाणून घेऊया टीम इंडियाच्या विजयाची कारणं.
– टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला. त्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मैदान आणि खेळपट्टीची स्थिती लक्षात घेता, या मॅचमध्ये टॉसची भूमिका महत्त्वाची होती. जिथे नशिबाची साथ टीम इंडियाला मिळाली.
– अक्षर पटेलने शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करता आली नाही. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देत होती. रोहितने अक्षरला सलग दोन ओव्हर गोलंदाजी दिली. अक्षरने दोन ओव्हर्समध्ये 13 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नाहीत.
– 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. रोहित शर्माने टीमला तशी सुरुवात करुन दिली. रोहित शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून होता. त्याने नाबाद 46 धावा केल्या. टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
– ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची रोहितने चांगलीच धुलाई केली. षटकारांचा पाऊस पाडला. टीम इंडियाच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या. ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी शॉर्ट पीच चेंडूंचा मारा केला. योग्य लाइन लेंग्थची कमतरता दिसून आली.