IND vs AUS Test : दोन मोठ्या कारणांमुळे शेवटच्या क्षणी टीम इंडियाच दिल्लीतील हॉटेल बदललं

IND vs AUS Test : अखेरच्या क्षणी टीम इंडियाच दिल्लीत मुक्कामच हॉटेल बदलण्यात आलय. यावेळी टीम इंडिया दिल्लीत दुसऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. टीम इंडियाच दिल्लीतील हॉटेल का बदलण्यात आलं? त्यामागे दोन कारणं आहेत.

IND vs AUS Test : दोन मोठ्या कारणांमुळे शेवटच्या क्षणी टीम इंडियाच दिल्लीतील हॉटेल बदललं
ind vs aus 2nd testImage Credit source: you tube
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 11:57 AM

IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी टीम इंडिया दिल्लीत दाखल झालीय. दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. नागपूरमधील पहिला कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने 4 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय टीमला दिल्ली कसोटीत ही आघाडी वाढवून 2-0 करायची आहे. त्यांची तयारी जोरात सुरु आहे. यावेळी अखेरच्या क्षणी टीम इंडियाच दिल्लीत मुक्कामच हॉटेल बदलण्यात आलय. यावेळी टीम इंडिया दिल्लीत दुसऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. टीम इंडियाच दिल्लीतील हॉटेल का बदलण्यात आलं? त्यामागे दोन कारणं आहेत.

नेहमी टीम इंडिया कुठल्या हॉटेलमध्ये उतरते?

टीम इंडियात दिल्लीत सामना खेळण्यासाठी येते, तेव्हा त्यांच्यासाठी ITC मौर्या आणि ताज पॅलेस हॉटेलची बुकिंग केली जाते. पण PTI च्या वृत्तानुसार, टीम इंडिया यावेळी या दोन्ही पैकी कुठल्याही हॉटेलमध्ये थांबली नाहीय.

टीम इंडियाच हॉटेल का बदललं?

PTI नुसार, यावेळी नोएडाच्या हॉटेल लीलामध्ये टीम इंडियाच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलीय. दोन कारणांमुळे टीम इंडियाच हॉटेल बदलण्यात आलय. पहिलं कारण आहे, G20 संम्मेलन आणि दुसरं दिल्लीतील लग्नाचा सीजन. दिल्लीत ताज पॅलेस आणि ITC मौर्या दोन्ही हॉटेल्सवर मोठा लोड आहे. दोन्ही हॉटेल्समधील बहुतांश रुम्स बुक आहेत. त्यामुळे यावेळी टीम इंडियाच हॉटेल बदलण्यात आलय. विराट टीमसोबत नव्हता

हॉटेल लीलामध्येही चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. पर्याय नसल्यामुळे यावेळी दुसऱ्या हॉटेलची निवड करण्यात आली, असं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं. विराट कोहली टीमसोबत हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबला नाहीय. विराट कोहली मूळचा दिल्लीचा आहे. तो गुरुग्राम येथील आपल्या घरी थांबलाय. आज विराट कोहली हॉटेलमध्ये चेक इन करु शकतो. विराटने घरी थांबण्यासाठी टीम मॅनेजमेंटकडून स्पेशल परवानगी घेतली होती.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.