IND vs AUS : टेस्ट सीरीजमधून राहुलचा पत्ता कट होऊ शकतो, ‘या’ खतरनाक खेळाडूपासून करिअर धोक्यात
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये केएल राहुलचा पत्ता कट होऊ शकतो. टीम इंडियाकडे एक खतरनाक खेळाडू आहे, जो ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी केएल राहुलचा पत्ता कट करु शकतो.
IND vs AUS, Test Series: भारत पुढच्या महिन्यात 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांची हायप्रोफाईल टेस्ट सीरीज खेळणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. बऱ्याच महिन्यानंतर रोहित शर्मा टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करताना दिसेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये केएल राहुलचा पत्ता कट होऊ शकतो. टीम इंडियाकडे एक खतरनाक खेळाडू आहे, जो ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजसाठी केएल राहुलचा पत्ता कट करु शकतो.
राहुलला संधी मिळण्याची शक्यता कमी
नुकतच केएल राहुल अभिनेत्री आथिया शेट्टीसोबत विवाहबद्ध झाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी केएल राहुलचा टीम इंडियात समावेश करण्यात आलाय. पण राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण दिसतय. कॅप्टन रोहित शर्माकडे एक खतरनाक अस्त्र आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये तो प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसू शकतो. याच खेळाडूमुळे केएल राहुलच प्लेइंग इलेव्हनमधील स्थान धोक्यात आहे.
राहुलच्या टेस्ट करिअरला ‘या’ खेळाडूपासून धोका
टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल सध्या खोऱ्याने धावा करतोय. 23 वर्षीय स्टार ओपनर शुभमन गिलने 21 वनडे सामन्यात 73.76 च्या सरासरीने 109.80 च्या स्ट्राइक रेटने 1254 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने आपल्या 19 व्या वनडे इनिंगमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. शुभमन गिलने आपल्या शेवटच्या चार वनडे मॅचेसमध्ये तीन शतक झळकवली आहेत. यावरुन तो किती जबरदस्त फॉर्ममध्ये आहे ते समजतय.
‘तो’ राहुलपेक्षा चांगला ओपनर ठरेल
शुभमन गिलचा हाच जबरदस्त फॉर्म लक्षात घेऊन कॅप्टन रोहित शर्मा त्याला सलामीला संधी देऊ शकतो. रोहित त्याच्यासोबत इनिंग ओपन करेल. अशा स्थितीत केएल राहुलला टीमबाहेर बसाव लागेल. टेस्ट क्रिकेटमध्ये केएल राहुलची कामगिरी खूपच साधारण आहे. केएल राहुलने टीम इंडियासाठी 45 कसोटी सामन्यात 34.26 च्या साधारण सरासरीने फक्त 2604 धावा केल्या आहेत. टेस्टमध्ये केएल राहुलच्या नावावर 7 सेंच्युरी आणि 13 हाफ सेंच्युरी आहेत. केएल राहुलचा टेस्ट क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेटही खराब आहे. केएल राहुलचा टेस्ट क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट 52.07 आहे. त्यामुळे शुभमन गिल केएल राहुलपेक्षा चांगला ओपनर ठरु शकतो.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन टेस्टसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजचे सामने
पहिली टेस्ट मॅच, 9-13 फेब्रुवारी, सकाळी 9.30, नागपूर
दुसरा टेस्ट मॅच, 17-21 फेब्रुवारी, सकाळी 9.30, दिल्ली
तिसरी टेस्ट मॅच, 1-5 मार्च, सकाळी 9.30, धर्मशाला