KL Rahul च्या मनात त्याच्या बॅटबद्दल शंका आहे का? एका कृतीमुळे सर्वांना पडला प्रश्न
KL Rahul : केएल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, असं अनेकांच मत आहे. त्यामुळे केएल राहुलवरुन इतका गहजब सुरु आहे. टीम इंडियाकडून खेळलेले दोन माजी दिग्गज क्रिकेटपटू केएल राहुलवरुन सोशल मीडियावर आपसात भिडतायत.
IND vs AUS Test : सध्या टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल चर्चेत आहे. पण ही चर्चा सकारात्मक नाहीय. नकारात्मक आहे. चुकीच्या कारणांमुळे केएल राहुलच नाव चर्चेत आहे. खराब फॉर्ममध्ये असूनही त्याला टीम इंडियात स्थान मिळालय. ते अनेकांना पटलेलं नाही. केएल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, असं अनेकांच मत आहे. त्यामुळे केएल राहुलवरुन इतका गहजब सुरु आहे. टीम इंडियाकडून खेळलेले दोन माजी दिग्गज क्रिकेटपटू केएल राहुलवरुन सोशल मीडियावर आपसात भिडतायत. मागच्या 10 इनिंगमध्ये केएल राहुलने फक्त 125 धावा केल्या आहेत.
राहुलचा फॉर्म चिंतेचा विषय
याच परफॉर्मन्समुळे कदाचित त्याला इंदूर येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार नाही. केएल राहुलचा फॉर्म चिंतेचा विषय असताना, नुकतीच त्याने SG फॅक्टरीला भेट दिली. कंपनीचे सहमालक पारस आनंद यांच्याबरोबर त्याने चर्चा केली.
SG च्या टीमसोबत चर्चा
केएल राहुल SG कंपनीची बॅट आणि अन्य वस्तू वापरतो. तो वापरत असलेल्या वस्तुंची दोषरहित निर्मिती व्हावी, हा या भेटीमागे उद्देश होता. त्याने सुधारणा घडवण्यासाठी SG च्या टीमसोबत सुद्धा चर्चा केली. केएल राहुलसह एसजी कंपनी हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना आणि मोहम्मद सिराज यांना सुद्धा वस्तुंचा पुरवठा करते.
SG संबंधात थोडं वाचा
SG ही क्रिकेटसंबंधित उपकरणांची निर्मिती करणारी क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी कंपनी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी केदारनाथ आनंद आणि द्वारका नाथ आनंद यांनी 1931 साली बिझनेस सुरु केला. निर्यात केंद्रीत त्यांनी उद्योग उभारला. 1970 साली सुनील गावस्कर यांनी SG ची निवड केली. त्यानंतर पुढे घडला तो इतिहास आहे.
View this post on Instagram
राहुलवरुन वेंकटेश प्रसाद-आका चोपडामध्ये वाद
वेंकटेशन प्रसाद केएल राहुलच्या टीममधील निवडीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करतायत. त्याचवेळी दुसरा माजी खेळाडू आकाश चोपडा केएल राहुलच समर्थन करतोय. यावरुन या दोन माजी खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला आहे. दोघांमधील तणाव आता वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलाय. वेंकटेश प्रसाद यांनी सोशल मीडियावर केएल राहुल विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांचे टि्वटस चर्चेचा विषय बनतायत. त्याचवेळी आकाश चोपडा केएल राहुलच समर्थन करतायत. आकाश चोपडा आणि वेंकटेश प्रसादमध्ये सुरु झालेल्या या वादाने आता टोक गाठलय.