IND vs AUS Test : दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी टीम इंडियाकडून पीच संदर्भात काही खास निर्देश का? महत्त्वाची अपडेट
IND vs AUS Test : नागपूर कसोटीचा निकाल फक्त 3 दिवसात लागला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा जोश हाय आहे. भारतातील विकेट्सच ऑस्ट्रेलियासमोर मुख्य आव्हान आहे.
IND vs AUS Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना दिल्लीमध्ये खेळला जणार आहे. नागपूर कसोटीचा निकाल फक्त 3 दिवसात लागला. त्यामुळे दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा जोश हाय आहे. भारतातील विकेट्सच ऑस्ट्रेलियासमोर मुख्य आव्हान आहे. खेळपट्टीशी जुळवून कसं घ्यायचं? हे ऑस्ट्रेलियासमोर मुख्य चॅलेंज आहे. ऑस्ट्रेलियन प्लेयर्स कोटलाच्या पीचवर सराव करतायत. दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पण त्याआधी दिल्लीच्या पीचबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आलीय.
टीम इंडियाकडून कोणते निर्देश?
दिल्लीच्या पीच संदर्भात टीम इंडियाकडून अजून कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत, असं वृत्त पीटीआयने DDCA च्या हवाल्याने दिलं आहे. DDCA चा ग्राऊंड स्टाफ अरुण जेटली स्टेडियमच्या पीचवर पाणी टाकण्याच काम सातत्याने करतोय.
नागपूरनंतर समजून घ्या दिल्लीच्या पीचबद्दल
नागपूरच्या पीचवरुन बराच गदारोळ झाला. ऑस्ट्रेलियन मीडियाने हा पीच भारताच कारस्थान असल्याच सांगितलं. पण सत्य काय? ते तीन दिवसात जगाला समजलं. ऑस्ट्रेलियन टीम स्पिन गोलंदाजी खेळताना किती चाचपडते, ती त्यांची सर्वात मोठी कमकुवत बाजू आहे, हे प्रकर्षाने दिसून आलं.
पीच कसा असेल?
नागपूर नंतर आता दुसरा कसोटी सामना दिल्लीत आहे. भारतीय टीमने पीचबद्दल कुठलीही खास डिमांड केलेली नाही, असं पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं. पीचवर पाणी मारण्याचा सिलसिला कायम आहे. पीच कसा असेल? सध्या त्या बद्दल काहीही अपडेट नाहीय.
मिचेल स्टार्कची जोरदार प्रॅक्टिस
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने नेट्समध्ये जोरदार सराव केला. त्याने जवळपास 20 मिनिट प्रॅक्टिस केली. या दरम्यान त्याने गोलंदाजीचा चांगला अभ्यास केला. दुसऱ्या कसोटीत मिचेल स्टार्कच खेळणं निश्चित समजल जातय. स्टार्कच्या खेळण्यामुळे ऑस्ट्रेलियाच काम किती सोपं होतं, ते लवकरच समजेल. टीम इंडियाकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज
भारतीय टीम आता वेगवान गोलंदाजी सहजतेने खेळते. पण भारतीय खेळपट्टयांवर टीम इंडियाच प्राधान्य फिरकी गोलंदाजीला आहे. टीम इंडियाचे बॅट्समन फिरकी गोलंदाजी खेळताना अडखळतात. पण टीम इंडियाकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. अश्विन, जाडेजा, अक्षर, कुलदीप यांच्या बळावरच टीम इंडियाने नागपुरात ऑस्ट्रेलियाला तीन दिवसात लोळवलं.