IND vs AUS : BCCI विरुद्ध ICC, इंदोरच्या पीचवरुन जुंपली, ICC समोर ठेवली मोठी मागणी
IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना इंदोरमध्ये खेळला गेला होता. चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला. टीम इंडियाने ही सीरीज 2-1 ने जिंकली. टीम इंडियाने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं.
IND vs AUS Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामनध्ये टेस्ट सीरीज संपली आहे. पण या कसोटी मालिकेत पीचवरुन काही वाद झाले. त्यावर आता BCCI ने Action घेतली आहे. इंदोरची खेळपट्टी खराब होती, असं ICC च म्हणणं आहे. त्याला बीसीसीआयने विरोध केला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना इंदोरमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने ही टेस्ट मॅच 3 दिवसात जिंकली होती. कसोटी 3 दिवसात निकाली निघाल्यानंतर मॅच रेफ्ररी क्रिस ब्रॉड यांनी इंदोरच्या पीचला खराब रेटिंग दिली होती.
बीसीसीआयने क्रिस ब्रॉड यांच्या या निर्णयावर फेरविचार करण्याची ICC कडे मागणी केली आहे. भारतीय क्रिकेटमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, ICC ने पीचच्या बाबतीत घाईगडबडीत निष्कर्ष काढला आहे.
इंदोर पीचला किती डिमेरिट पॉइंट्स?
क्रिस ब्रॉड यांनी इंदोरच्या होळकर स्टेडियमच्या पीचला 3 डिमेरिट पॉइंट्स दिले होते. या डिमेरिट पॉइंट्सचा काय परिणाम होतो? या संदर्भात काय नियम-कायदे आहेत?
नियम काय सांगतो?
क्रिकेटच्या नियमानुसार, ICC कडून कुठल्याही स्टेडियमच्या पीचला 5 डिमेरिट पॉइंट्स दिल्यास, पुढचे 12 महिने त्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करता येत नाही. तसंच ICC ने कुठल्याही पीचला 10 डिमेरिट पॉइंट्स दिल्यास तिथे दोन वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करता येत नाही.
बीसीसीआयने पत्रात काय म्हटलय?
डिमेरिट पॉइंट्सशी संबंधित नियम समजल्यानंतर BCCI ने ICC कडे निर्णयाचा फेरविचार करण्याची केलेली मागणी किती योग्य आहे, ते तुमच्या लक्षात आलं असेल. BCCI ने रिव्यूची मागणी करताना ICC ला पत्र लिहिलं आहे. निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी पत्रातून केली आहे. BCCI च्या या मागणीनंतर तपासासाठी ICC ने दोन सदस्यीय समिती बनवल्याचं वृत्त आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधला चौथा कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला. चौथा कसोटी सामना ड्रॉ झाला. टीम इंडियाने ही सीरीज 2-1 ने जिंकली. टीम इंडियाने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं.