IND vs AUS- गर्लफ्रेंडने भररस्त्यात ऑस्ट्रेलियन माजी कर्णधाराच्या कानाखाली मारली, BCCI घेणार मोठा निर्णय
IND vs AUS- रस्त्यात जोडीदारासोबत भांडण ऑस्ट्रेलियन माजी कॅप्टनला महाग पडणार. 1 लाख डॉलर्सचा कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार? या वादामुळे आधीच स्पॉन्सरशिपचे काही कॉन्ट्रॅक्ट गमावले आहेत.
सिडनी – रस्त्यात जोडीदारासोबत भांडण करणं, ऑस्ट्रेलियन माजी कर्णधाराला भोवणार आहे. रस्त्यात जोडीदारासोबत वाद घालणाऱ्या या ऑस्ट्रेलियन कर्णधारच नाव आहे, मायकल क्लार्क. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, मायकल क्लार्कने या वादामुळे आधीच स्पॉन्सरशिपचे काही कॉन्ट्रॅक्ट गमावले आहेत. क्वीन्सलँडच्या रस्त्यावर मायकल क्लार्क आणि जेड यारबोरोमध्ये वाद झाला. या वर्तनाबद्दल बीसीसीआय सुद्धा आता मायकल क्लार्कवर कारवाई करु शकते. बीसीसीआय आगामी भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजच्या क़ॉमेंट्री पॅनलमधून मायकल क्लार्कला हटवू शकते. बीसीसीआयल क्लार्कला ड्रॉप करण्याचा निर्णय घेऊ शकते.
बीसीसीआय ड्रॉप करणार?
द डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, जोडीदारासोबतच्या वादामुळे बीसीसीआय क्लार्कच्या कॉमेंट्री पॅनलमधील स्थानाबद्दल विचार करणार आहे. येत्या 9 फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजला सुरुवात होणार आहे. नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. बीसीसीआय मायकल क्लार्कला कॉमेंट्री पॅनलमधून ड्रॉप करु शकते, असं द डेली टेलिग्राफच्या वृत्तात म्हटलं आहे.
स्पॉन्सरशिप गमावली
मॅथ्यू हेडनसोबत मायकल क्लार्क भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजमध्ये कॉमेंट्री करणार आहे. क्लार्कसोबत 1 लाख अमेरिकन डॉलर्सचा कॉन्ट्रॅक्ट आहे. क्लार्कला आता या सगळ्या पैशांवर पाणी सोडाव लागू शकतं. सार्वजनिक ठिकाणी क्लार्कने जोडीदारासोबत वाद घातल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला काही स्पॉन्रशिप्सवर पाणी सोडाव लागलं. कानाखाली मारली
10 जानेवारी नूसा येथे एका हॉटेलबाहेर क्लार्क आणि जेड यारबोरोमध्ये वाद झाला. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या एका माणसाने व्हिडिओ शूट केला. द डेली टेलिग्राफने हा व्हिडिओ चालवला. या व्हिडिओमध्ये जेड यारबोरो क्लार्कवर आरोप करताना दिसतेय. 41 वर्षीय क्लार्क हे आरोप फेटाळत होता. जेड यारबोरो क्लार्कच्या कानाखाली मारत होती. ओरडत होती. क्वीन्सलँड पोलीस या सर्व प्रकरणाची चौकशी करतायत. त्यांनी कोणाविरोधातही आरोप निश्चित केलेले नाहीत.