Suryakumar Yadav : इच्छापुर्ती होताच सूर्या 2000 किलोमीटर प्रवास करुन देवदर्शनासाठी पोहोचला ‘या’ मंदिरात

Suryakumar Yadav : सध्या टीम इंडिया कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाकडेच रहाणार आहे. या दोन्ही टीम्समध्ये तिसरा कसोटी सामना इंदूर येथे होणार आहे.

Suryakumar Yadav : इच्छापुर्ती होताच सूर्या 2000 किलोमीटर प्रवास करुन देवदर्शनासाठी पोहोचला 'या' मंदिरात
Suryakumar yadavImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 7:43 AM

हैदराबाद : भारतीय क्रिकेट टीममधील आक्रमक बॅट्समन सूर्यकुमार यादव सध्या ब्रेकवर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या चार टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये तो टीम इंडियाचा भाग आहे. सध्या टीम इंडिया कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाकडेच रहाणार आहे. या दोन्ही टीम्समध्ये तिसरा कसोटी सामना इंदूर येथे होणार आहे. या टेस्ट मॅचआधी सूर्यकुमार यादव आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात गेला होता. सूर्यकुमार यादवने पत्नी देविशासोबत तिरुपती बालाजींच दर्शन घेतलं.

सूर्यकुमारच हे स्वप्न पूर्ण झालय

सूर्यकुमार यादवला नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळालं होतं. या कसोटीतून त्याने टेस्ट डेब्यु केला. दिल्लीमध्ये दुसऱ्या कसोटीसाठी त्याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला नाही. त्याच्याजागी दुखापतीमधून पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरला संधी मिळाली. टेस्ट डेब्यु करणं कुठल्याही खेळाडूच स्वप्न असतं. सूर्यकुमारच हे स्वप्न पूर्ण झालय. टेस्ट टीममध्ये स्थान पक्क करण्याचा सूर्यकुमार यादवचा प्रयत्न असेल. दिल्ली टेस्ट मॅचनंतर टीमच्या खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे. याच ब्रेकमध्ये सूर्या तिरुपतीच्या दर्शनासाठी आला. दिल्ली ते तिरुपती अंतर 2000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

सेल्फीसाठी झुंबड

सूर्यकुमारने पांढऱ्या रंगाचा सदरा-लेंगा तर पत्नीने लाल रंगाचा सूट परिधान केला होता. सूर्यकुमारला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेत होते. सूर्यकुमारसोबत सेल्फी काढण्यासाठी चढाओढ सुरु होती. त्यावेळी राजकुमारी सुद्धा तिथे होती

सूर्यकुमार आणि त्याच्या पत्नीने स्वत:चे वेगवेगळे फोटो सुद्धा काढले. सूर्यकुमार मंदिरात दर्शनासाठी आला, त्याचवेळी जयरपूरची राजकुमारी दिया कुमारी सुद्धा तिथे पोहोचली होती. पण सूर्यकुमार आणि दिया कुमारी यांचा आमना-सामना किंवा भेट झाली नाही.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.