IND vs AUS : Rohit Sharma ने चांगल्या खेळाडूला संधी नाकारुन आपल्या पायावर मारली कुऱ्हाड

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजमध्ये टीम संकटात असताना हा प्लेयर निश्चित उपयोगाला आला असता. कॅप्टन रोहित शर्माकडे बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये एका दिग्गज खेळाडूला निवडण्याची संधी होती.

IND vs AUS : Rohit Sharma ने चांगल्या खेळाडूला संधी नाकारुन आपल्या पायावर मारली कुऱ्हाड
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 10:48 AM

IND vs AUS Test Series : ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये टीम इंडियाला एक चांगल्या विकेटकीपर फलंदाजाची उणीव जाणवतेय. बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या केएस भरतवर विकेटकिपिंगसाठी अवलंबून आहे. आतापर्यंत तीन कसोटी सामन्यात केएस भरत विशेष प्रभावी कामगिरी करु शकलेला नाही. बॅटिंग आणि विकेटकीपिंगमध्ये त्याने निराश केलय. नागपूर, दिल्ली आणि इंदोर कसोटीत टर्निंग पीचेसवर केएस भरत विकेटकिपींग दरम्यान संघर्ष करताना दिसला. केएस भरतने ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूर, दिल्ली आणि इंदोर टेस्टमध्ये 8,6,23 (नाबाद), 17 आणि 3 धावाच केल्या. चालू सीरीजमध्ये टीम इंडियाला केएस भरतपेक्षा चांगल्या विकेटकीपरची गरज आहे.

दिग्गज खेळाडूला निवडण्याची संधी होती

ऋषभ पंत मागच्यावर्षी कार अपघातात गंभीर जखमी झाला. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानापासून तो सात-आठ महिने लांब रहाणार आहे. कॅप्टन रोहित शर्माकडे बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये एका दिग्गज खेळाडूला निवडण्याची संधी होती. पण त्याची निवड केली नाही. एकप्रकारे रोहित शर्माने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली. या खेळाडूकडे अनुभव आहे. त्याचं नाव आहे ऋद्धिमान साहा. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजमध्ये तो खूप उपयोगी ठरला असता.

117 धावा करुन ऑस्ट्रेलिया विरुद्ध वाचवली होती टेस्ट मॅच

ऋद्निमान साहा भारताचा उत्तम विकेटकीपर फलंदाज आहे. भारताच्या टर्निंग पीचेसवर त्याच्याकडे बॅटिंग आणि विकेटकीपिंगचा चांगला अनुभव आहे. वर्ष 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन टीम चार कसोटी सामन्यांची सीरीज खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी रांचीच्या टर्निंग पीचवर साहाने 117 धावांची इनिंग खेळून कसोटी सामना वाचवला होता. तो चांगला पर्याय ठरला असता

ऋद्धिमान साहाने वर्ष 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट डेब्यु केला. तो भारतासाठी 40 कसोटी सामने खेळला. भारतीय टीम मॅनेजमेंटने आधीच 37 वर्षांचा साहा टीमच्या भविष्याच्या योजनांचा भाग नसल्याचं स्पष्ट केलय. ऋद्धिमान साहाला टेस्ट टीम बाहेर केलं. ऋद्धिमान साहाने 40 टेस्ट मॅचमध्ये 29.41 च्या सरासरीने आतापर्यंत 1353 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 3 सेंच्युरी आणि 6 हाफ सेंच्युरी झळकवल्या. ऋद्विमान साहा ऑस्ट्रेलिया विरुद्ध या चार टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये केएस भरतला चांगला पर्याय ठरला असता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.