IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियन खेळाड़ू घाबरुन भारतातून पळ काढतायत ? ‘हा’ खेळाडू कॅप्टनशिपसाठी स्टँडबायवर

IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीज जिंकण्याच्या इराद्याने ते भारतात आले होते. पण पहिल्या दोन कसोटीत पराभव झाल्यामुळे आता बॉर्डर-गावस्कर सीरीज भारताकडेच राहणार आहे. कारण आता जास्तीत जास्त मालिका बरोबरीत सुटू शकते.

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियन खेळाड़ू घाबरुन भारतातून पळ काढतायत ? 'हा' खेळाडू कॅप्टनशिपसाठी स्टँडबायवर
Australian TeamImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 1:58 PM

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियन टीमला झटक्यावर झटके बसत आहेत. आधीच त्यांचा दोन कसोटीत पराभव झाल्यामुळे ते सीरीजमध्ये 2-0 ने पिछाडीवर पडले आहेत. बॉर्डर-गावस्कर सीरीज जिंकण्याच्या इराद्याने ते भारतात आले होते. पण पहिल्या दोन कसोटीत पराभव झाल्यामुळे आता बॉर्डर-गावस्कर सीरीज भारताकडेच राहणार आहे. कारण आता जास्तीत जास्त मालिका बरोबरीत सुटू शकते. पराभवापाठोपाठ ऑस्ट्रेलियन टीमला दुखापतीच ग्रहण लागलय. डेविड वॉर्नर दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकणार असल्याच स्पष्ट झालय. जोश हेझलवूड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये झालेल्या दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे तो पहिले दोन कसोटी खेळू शकला नाही. उर्वरित दोन कसोटीत त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. आता ऑस्ट्रेलियासाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे.

कमिन्सच्या निर्णयात अचानक बदल

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स मायदेशी परतला आहे. त्याच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी असल्याने तो ऑस्ट्रेलियात गेला आहे. कालपर्यंत पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीसाठी पुन्हा परत येणार असल्याच म्हटलं जात होतं. 1 मार्चपासून इंदोरमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. पण आता पॅट कमिन्स उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी मायदेशी परतणार नसल्याच वृत्त आहे. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलय.

मग ऑस्ट्रेलियाच नेतृत्व कोण करणार?

कसोटीच नाही वनडे सीरीजसाठी सुद्धा पॅट कमिन्स भारतात परतणार नसल्याच वृत्त आहे. त्यामुळे उर्वरित दोन टेस्टसाठी पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथला स्टँडबायवर सज्ज रहाण्यास सांगण्यात आलं आहे. कमिन्स वनडे सीरीजसाठी परतला नाही. तर स्मिथच नेतृत्व करेल.

डेविड वॉर्नरही बाहेर

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक ओपनर डेविड वॉर्नर कसोटी मालिकेतून बाहेर गेलाय. तो उर्वरित कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. डेविड वॉर्नर उर्वरित टेस्ट सीरीजमध्ये खेळणार नसल्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती. हेल्मेट आणि हातावर चेंडू लागला

दोन टेस्ट मॅचमधील खराब कामगिरी आणि दुखापतीने डेविड वॉर्नरला मायदेशी परतण्यास भाग पाडलय. दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये वॉर्नरच्या हेल्मेट आणि हातावर चेंडू लागला होता. त्यामुळे तो दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करु शकला नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.