या दोन युवा खेळाडू्ंची प्रतिक्षा संपणार, शेवटच्या सामन्यात मिळू शकते संधी
India vs Australia 5th T20: टीम इंडियाने चौथ्या सामन्यातच मालिका जिंकली आहे. अशा स्थितीत आता शेवटच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची संधी आहे. टीम इंडियाच्या संघात असे फक्त 2 खेळाडू आहेत, ज्यांना या मालिकेतील चारही सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली.
Ind vs Aus : भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार टी-20 सामन्यांमध्ये तीन सामने जिंकत मालिका जिंकली आहे. अजूनही एक सामना होणे बाकी आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. चौथ्या सामन्यात टीम इंडियाने 174 धावा केल्यानंतर आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर सामना आणि मालिकाही जिंकली.
या 2 खेळाडूंना संधी मिळाली नाही
मालिका जिंकून शेवटचा सामना बाकी असताना टीम इंडिया त्या खेळाडूंनाही संधी देऊ शकते ज्यांना शेवटच्या 4 सामन्यांमध्ये स्थान मिळाले नाही. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी 14 खेळाडूंना आतापर्यंत संधी मिळाली आहे. केवळ 2 खेळाडूंना अद्याप संधी मिळालेली नाही आणि त्यांना रविवारी संधी मिळू शकते. योगायोगाने हे दोघेही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळलेले खेळाडू आहेत.
दोघांची प्रतीक्षा संपणार
वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांची प्रतिक्षा संपण्याची शक्यता आहे. हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू शेवटच्या 4 सामन्यांपासून आपल्या संधींची वाट पाहत होते आणि फक्त ड्रिंक्स घेऊन मैदानात जात होते. त्यांना शेवटच्या सामन्यात संधी मिळू शकते. त्यांच्यासाठी जागा कशी बनवणार हा प्रश्न आहे. त्यामुळे पाचव्या T20 मध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्या जागी श्रेयस अय्यर संघाची कमान सांभाळताना दिसू शकतो.
अक्षर पटेललाही विश्रांती दिली जाऊ शकते, तर रिंकू सिंगलाही सलग ४ सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर शेवटच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. अशा प्रकारे शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. या दोघांशिवाय, युवा फलंदाज तिलक वर्मा देखील संघात पुनरागमन करू शकतो, ज्याला चौथ्या टी-20 मध्ये श्रेयस अय्यरसाठी बाहेर बसावे लागले.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेवन
श्रेयस अय्यर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, आवेश खान, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम
मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, नॅथन एलिस आणि केन रिचर्डसन.