IND vs AUS : हरमनप्रीत स्वत:ला कमनशिबी म्हणते, पण तिला Run out करणाऱ्या विकेटकीपरच वेगळं मत
लाखो चाहत्यांच मन मोडलं. या मॅचचा सर्वाधिक परिणाम हरमनप्रीत कौरवर दिसून आला. मॅचनंतर तिला आपले अश्रु रोखता आले नाहीत. हरमनप्रीत कौर आणि टीम इंडियाच्या जखमेवर आता ऑस्ट्रेलियन खेळाडूने मीठ चोळलय.
T20 World cup : भारतीय महिला टीम T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवातून अजून सावरलेली नाही. ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी निसटता पराभव झाला. त्यामुळे लाखो चाहत्यांच मन मोडलं. या मॅचचा सर्वाधिक परिणाम हरमनप्रीत कौरवर दिसून आला. मॅचनंतर तिला आपले अश्रु रोखता आले नाहीत. हरमनप्रीत कौर आणि टीम इंडियाच्या जखमेवर आता ऑस्ट्रेलियन विकेटकीपर बॅट्समन एलिसा हिलीने मीठ चोळलय.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध या सामन्यात टीम इंडिया विजयाच्या स्थितीमध्ये होती. हरमनप्रीत कौर आऊट होताच मॅच पलटली. कौरला एलिसा हिलीने रनआऊट केलं. हरमनप्रीत कौरने सामना संपल्यानंतर सांगितलं, ‘मी कमनशिबी ठरले. रनआऊट झाले’ ऑस्ट्रेलियन विकेटकीपर एलिसा हिलीच हरमनप्रीतच्या रनआऊट होण्यावर वेगळं मत आहे.
“Harmanpreet can say all she likes that it was so unlucky.” ?
For all young cricketers wanting to learn the value of staying alert on the field, listen to Alyssa Healy.
100% correct.? pic.twitter.com/Uu46ggwiQ6
— ABC SPORT (@abcsport) February 26, 2023
हिली काय म्हणाली?
“हरमनप्रीत कौर अनलकी ठरली, असं म्हणू शकते. पण तुम्ही वेळेत क्रीजमध्ये पोहोचू शकला नाहीत, हे वास्तव आहे. तिने पूर्ण जोर लावून प्रयत्न केला असता, तर चित्र वेगळ दिसू शकलं असतं. तुम्ही आयुष्यभर अनलकी म्हणू शकता. पण तुमचे प्रयत्न आणि एनर्जीवर अवलंबून असतं” असं हिली एबीसी स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे. हरमनप्रीतने काय म्हटलं?
मॅचनंतर हरमनप्रीत कौरने तिच्या रनआऊट होण्याबद्दल प्रेस कॉन्फरन्समध्ये वक्तव्य केलं होतं. “मी ज्या पद्धतीने रनआऊट झाली, त्यापेक्षा जास्त काही अनलकी असू शकत नाही. प्रयत्न करणं महत्त्वाच आहे. मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याचा प्रयत्न केला. पण रिझल्ट आमच्या बाजूने आला नाही. आम्ही ज्या पद्धतीने या टुर्नामेंटमध्ये खेळलो, त्यावर आनंदी आहे” असं हरमनप्रीत कौर म्हणाली.