IND vs BAN: Rohit Sharma खेळत नसल्यामुळे मोठं टेन्शन मिटलं, प्रसिद्ध क्रिकेटपटूच विधान
IND vs BAN: उलट राहुल द्रविड यांच काम सोपं झालय.
ढाका: टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर आहे. उद्यापासून पहिला कसोटी सामना सुरु होतोय. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीचा सामना करतायत. या यादीत कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा आहे. रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळत नाहीय. रोहितच्या या दुखापतीवर भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने मोठ विधान केलय. रोहितच्या दुखापतीमुळे टीममध्ये सिलेक्शनची प्रक्रिया सोपी झालीय. याचा भारताचे हेड कोच राहुल द्रविड यांना फायदा होईल.
…तर मग एक बाहेर बसला असता
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने रोहितच्या दुखापतीवर विधान केलय. रोहितच्या अनुपस्थितीत टीम सहजतेने आपल्या ओपनिंग जोडीच सिलेक्शन करु शकते. या सीरीजमध्ये ओपनर म्हणून रोहित शिवाय केएल राहुल आणि शुभमन गिल यांचा समावेश केलाय. रोहित फिट ठरला असता, तर या दोघांपैकी एका खेळाडूला बाहेर बसाव लागलं असतं.
टीमच्या प्लेइंग 11 बद्दल काय म्हणाला?
मोहम्मद कैफ सोनी स्पोर्ट्सवर प्लेइंग 11 बद्दल बोलत होता. रोहितच्या उपस्थितीत टीमला ओपनिंग जोडीबद्दल विचार करावा लागला असता. कारण शुभमन गिल आणि केएल राहुल टीममध्ये आहेत. रोहित पहिली मॅच खेळत नाहीय. त्यामुळे ओपनिंग जोडीची निवड करणं सोपं होईल. तिसऱ्या नंबरवर पुजारा, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली, पाचव्या नंबरवर श्रेयस अय्यर, त्यानंतर ऋषभ पंत येईल. द्रविड यांच्यासाठी सिलेक्शनच काम थोडं सोपं झालय.
रोहितच्या जागी या खेळाडूला संधी
रोहित शर्माच्या जागी पहिल्या कसोटीसाठी अभिमन्यु ईश्वरनचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. अभिमन्यु पश्चिम बंगालसाठी खेळतो. मागच्या काही सीजन्समध्ये त्याने शानदार प्रदर्शन केलय. पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अभिमन्यु ईश्वरनने फर्स्ट क्लासच्या 70 सामन्यात 43.22 च्या सरासरीने 4841 धावा केल्यात. यात 15 शतक आणि 20 अर्धशतकं आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोर 233 आहे. त्याने लिस्ट ए आणि टी 20 मॅचेसमध्ये चांगलं प्रदर्शन केलय.