IND vs BAN 2nd Test: 12 वर्षानंतर ‘तो’ पुन्हा टीम इंडियात, पण त्यासाठी कुलदीप यादववर अन्याय

IND vs BAN 2nd Test: मागच्या कसोटी सामन्याच्या हिरोलाच कोच-कॅप्टन जोडीने बाहेर बसवलं....

IND vs BAN 2nd Test: 12 वर्षानंतर 'तो' पुन्हा टीम इंडियात, पण त्यासाठी कुलदीप यादववर अन्याय
ind vs ban 2nd testImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 9:56 AM

ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये मीरपूर येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. चट्टोग्राम टेस्टमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. त्यामुळे मीरपूर टेस्टसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलाची शक्यता फारच कमी होती. टीम इंडियाने चट्टोग्राम टेस्टच्या हिरोला मीरपूरमध्ये नाही खेळवलं. त्यांनी त्या खेळाडूला बाहेर बसवून 12 वर्षापासून बाहेर असलेल्या प्लेयरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. हा कुलदीप यादव आणि जयदेव उनाडकटचा विषय आहे.

जयदेव शेवटचा कसोटी सामना कधी खेळलेला?

टीम इंडियाने मीरपूर कसोटी सामन्यात कुलदीप यादवला बाहेर बसवून त्याच्याजागी जयदेव उनाडकटला खेळवलय. जयदेव उनाडकट आपला शेवटचा कसोटी सामना वर्ष 2010 मध्ये खेळला होता. कुलदीप यादवने टीममध्ये दमदार पुनरागमन केलं होतं. तो मागच्या कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला होता.

मागच्या कसोटी सामन्याच्या हिरोला का बाहेर बसवलं?

कुलदीप यादव चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजयाचा हिरो ठरला होता. त्याने बॅटने 40 रन्स केल्या. त्याशिवाय गोलंदाजीत कमाल केली. दोन्ही इनिंगमध्ये मिळून त्याने 8 विकेट काढल्या होत्या. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

केएल राहुल काय म्हणाला?

मीरपूर कसोटीत कुलदीपच्या खेळण्याची पूर्ण खात्री होती. त्याला बाहेर बसवलं जाईल, याची कोणीच कल्पना केली नव्हती. पण असं झालं नाही. मीरपुरमध्ये टॉस जिंकल्यानंतर केएल राहुलने टीममध्ये एक बदल असल्याचं सांगितलं. कुलदीपच्या जागी जयदेव उनाडकटला खेळवण्याचा निर्णय त्याने जाहीर केला. हा रणनितीचा भाग असल्याचं राहुल म्हणाला.

राहुल जे सांगतोय, त्यापेक्षा आकडे बिलकुल उलट

जयदेव उनाडकटने शेवटचा कसोटी सामना सेंच्युरीयनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर 2022 मध्ये तो कसोटी सामना खेळण्यासाठी उतरला आहे. कसोटी करिअरमधील त्याचा हा दुसरा कसोटी सामना आहे. एक्सट्रा वेगवान गोलंदाज खेळवण्याची पीच आणि कंडीशन्सची डिमांड आहे असं राहुल जयदेव उनाडकटला खेळवण्याच्या निर्णयाबद्दल म्हणाला. केएल राहुलने जे कारण सांगितलं, ते मीरपुरच्या आकड्याच्या बिलकुल उलट आहे. मागच्या 5 कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स स्पिनर्सनी घेतल्यात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.