IND vs BAN : टीम इंडियाचा खेळाडू स्टेडियममध्येच पोहोचला नाही, बीसीसीआयने दिले असे अपडेट
भारत आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. ही मालिका भारताने आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असणार आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने संघात एक बदल केला आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात तिसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात एक बदल केला असून अर्शदीप सिंगला आराम दिला. त्याच्या ऐवजी संघात रवि बिश्नोई याला संधी दिली आहे. रवि बिश्नोई यापूर्वीच्या दोन सामन्यात खेळला नव्हता. पण दुसरीकडे, हर्षित राणा तिसऱ्या सामन्यातही खेळण्याची संधी मिळा नाही. आयपीएलमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या हार्षित राणा तिसऱ्या टी20 सामन्यातही वगळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. दरम्यान बीसीसीआयने एक अपडेट दिल्याने सर्व शंकांचं निरसन झालं आहे. बीसीसीआयने आपल्या अपडेटमध्ये सांगितलं की, ‘हार्षित राणा आजारी आहे त्याच्यामुळे आज खेळत नाही. हार्षित राणाला वायरल इन्फेक्शन झालं आहे. यासाठी तो संघासोबत स्टेडियममध्येच आला नाही.’ हार्षित राणाला या सामन्यातही खेळण्याची संधी न मिळाल्याने आता आयपीएल मेगा ऑक्शनमद्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून उतरणार आहे.
हार्षित राणा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. आतापर्यंत त्याने 21 सामने खेळले असून 21 सामन्यात 25 विकेट घेतले आहेत. 24 धावा देत 3 गडी बाद केल्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यामुळे आयपीएल लिलावात हार्षित राणासाठी मोठी बोली लागणार यात शंका नाही. पण आता टीम इंडियात खेळण्याची संधी न मिळाल्याने कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीचं फावणार आहे. अनकॅप्ड प्लेयर म्हणून त्याला रिटेन करू शकतात.
UPDATE: Mr. Harshit Rana was unavailable for selection for the third T20I due to a viral infection and did not travel with the team to the stadium.#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 12, 2024
दरम्यान, भारताने बांगलादेशविरुद्ध आक्रमक सुरुवात केली आहे. विकेटकीपर संजू सॅमसन याचा दांडपट्टा मैदानात सुरु झाला आहे. दोन सामन्यात फेल गेल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याचा आक्रमक पवित्रा दिसत आहे. पॉवरप्लेमध्ये जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. संजू सॅमसनने तस्किन अहमदला एका षटकात सलग 4 चौकार लगावले आणि आपला हेतूही स्पष्ट केला आहे.