6,6,6,6,6..! संजू सॅमसनचा बांगदेशलाविरुद्ध धूमधडाका, एका षटकात ठोकल्या 30 धावा Watch Video
भारत आणि बांग्लादेश यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचं दिसत आहे. आघाडीला आलेल्या संजू सॅमसनने बांगलादेशची पिसं काढली. गोलंदाजांना कुठे चेंडू टाकावा हेच कळत नव्हतं. एका षटकात सलग 5 षटकार मारत बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं.
भारत बांग्लादेश तिसऱ्या टी20 सामन्यात धावांचा पाऊस पडला. नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात संजू सॅमसन काय करतो? याकडे लक्ष लागून होतं. पण चाहत्यांना संजू सॅमसनने नाराज केलं आहे. पहिल्या चेंडूपासून संजू सॅमसनचा आक्रमक पवित्रा दिसला. इतक्या वेळ्या फेल गेल्यानंतर एखाद्या फलंदाजाचं मनोबळ खचतं. पण संजू सॅमसनच्या आक्रमक अंदाजात काहीच बदल दिसला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांना नेमका चेंडू कुठे टाकावा हेच कळत नव्हतं. बांगलादेशच्या रिशाद होसेनची अशीच काहीशी स्थिती झाली. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर त्याला थोडसं बरं वाटलं असेल. पण नंतरच्या पाच चेंडूवर संजू सॅमसनने कहर केला. त्याला कुठेच सोडला नाही. अक्षरश: रडकुंडीला आणलं होतं. त्याला सलग पाच षटकार ठोकत एका षटकात 30 केल्या. तर संजू सॅमसनने 40 चेंडूत शतकी खेळी पूर्ण केली.
बांगलादेशने संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव जोडी फोडण्यासाठी दहावं षटक रिशाद होसेनच्या हाती सोपवलं होतं. पहिल्या चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने रिशाद गरबा नाचवला. मैदानाच्या दिसेल त्या कोपऱ्यात चेंडू पोहोचवला. एक एक करत सलग पाच षटकार मारले. त्याच्या या खेळीचं सोशल मीडियावर जबरदस्त कौतुक होत आहे. भारताकडून एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा आणि रिंकु सिंह यांनी संयुक्तरित्या अफगाणिस्तानविरुद्ध 36 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 30 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता संजू सॅमसनचा नंबर लागला आहे.
🚨 SANJU SAMSON SMASHED 5 CONSECUTIVE SIXES IN AN OVER. 🚨
– Ruthless Sanju at the Uppal. 🥶pic.twitter.com/lagJlSMMlM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2024
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संजू सॅमसन आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत दक्षिण अफ्रिकेचा डेविड मिलर अव्वल स्थानी आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यानंतर रोहित शर्माने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 39 चेंडूत शतक ठोकलं. तर संजू सॅमसन या यादीत चौथ्या स्थानावर असून त्याने 40 चेंडूत शतक ठोकलं आहे.