IND vs BAN: 3 इनिंगमध्ये 3 शतक, हा युवा खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा?
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे अडचणीत आला आहे. दुसरीकडे संघापुढे ही फिटनेसमुळे आव्हान उभं राहिलं आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेशमध्ये भारतीय संघ फिटनेसमुळे अडचणीत सापडला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीने तो अधिक अडचणीत आला आहे. या दुखापतीमुळे तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळू शकणार नाही.रोहित शर्माच्या टेस्ट सीरीज खेळण्याबाबत ही प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे बंगाल क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर अभिमन्यू इश्वरनचा भारतीय संघात रोहितचा कव्हर म्हणून समावेश करण्यात आला आहे.इश्वरन सध्या बांगलादेशमध्ये असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग आहे, ज्यासाठी टीम इंडियाला अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळण्यासाठी या दोन सामन्यांसह उर्वरित सर्व कसोटी जिंकणे आवश्यक आहे.
रोहितच्या जागी संधी
प्रमुख खेळाडूंची दुखापत ही टीम इंडियासाठी अडचणीची ठरत आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याने फलंदाजी केली असली तरी त्याला पुन्हा मुंबईला परतावे लागले. जेथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याची तपासणी केली जाईल.रोहित संघाचा कर्णधारच नाही तर सलामीवीरही आहे.अशा स्थितीत बंगालचा २७ वर्षीय सलामीवीर ईश्वरनला त्याच्या जागी राखीव खेळाडू म्हणून संधी दिली जात आहे.
अभिमन्यू इश्वरनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे कारण केएल राहुल आणि शुभमन गिल संघासाठी सलामी करत आहेत.
ईश्वरन संघासाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो कारण तो सध्या भारत अ संघासोबत बांगलादेशमध्ये आहे. जिथे त्याने बांगलादेश अ विरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते.पहिला सामना अनिर्णित राहिला पण दुसऱ्या सामन्यात भारताने एक डाव आणि १२३ धावांनी विजय मिळवला. ईश्वरनने स्वतः या सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात त्याने 141 धावांची खेळी केली, तर दुसऱ्या सामन्यात त्याने 157 धावांची खेळी केली. याआधी त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगालकडून सर्व्हिसेसविरुद्ध 122 धावा केल्या होत्या.
भारतीय निवडकर्ते सध्या रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबतच्या अंतिम अहवालाची वाट पाहत आहेत. भारतीय कर्णधार दुस-या कसोटीपूर्वी बरा होईल आणि 22 डिसेंबरपासून ढाका येथे होणाऱ्या सामन्यात पुन्हा संघाची धुरा सांभाळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.