IND vs BAN: टीम इंडिया विरुद्ध वनडे सीरीजआधी बांग्लादेशला मोठा झटका
IND vs BAN: पहिली वनडे खेळण्याआधीच बांग्लादेशची टीम अडचणीत सापडली आहे.
ढाका: भारताविरुद्ध पहिली वनडे खेळण्याआधीच बांग्लादेशची टीम अडचणीत सापडली आहे. दोन्ही टीम्समध्ये तीन वनडे मॅचची सीरीज रविवारपासून सुरु होणार आहे. पहिला सामना ढाका येथे होईल. बांग्लादेशला ही सीरीज आपल्या नियमित कॅप्टनशिवाय खेळावी लागणार आहे. बांग्लादेशचा कॅप्टन तमीम इक्बाल संपूर्ण सीरीजमध्ये खेळणार नाहीय. तो पहिला कसोटी सामना खेळण्याची शक्यताही कमी आहे.
तीन वनडे सामने कधी?
भारतीय टीम गुरुवारी बांग्लादेशमध्ये दाखल झाली. पहिला वनडे सामना रविवारी होणार आहे. त्यानंतर बुधवारी 7 डिसेंबरला दुसरा आणि शनिवारी 10 डिसेंबरला शनिवारी तिसरा वनडे सामना होईल. बांग्लादेशचा कॅप्टन तमीमला दुखापत झालीय. त्यामुळे तो संपूर्ण सीरीजमध्ये खेळणार नाहीय. तमीमशिवाय तस्किन अहमदही पहिला वनडे सामना खेळणार नाहीय.
वॉर्म अप मॅच दरम्यान तमीमला दुखापत
बुधवार वॉर्म अप मॅच दरम्यान शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर तमीमला दुखापत झाली. त्याला ग्रोइन इंजरी झालीय. त्याला सलग दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला दिलाय. दोन्ही देशांमध्ये पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरला खेळला जाणार आहे. तमीम तो पर्यंत फिट होणार की, नाही? या बद्दल स्पष्टता नाहीय. शाकिब अल हसनची कॅप्टनशिपदी निवड होऊ शकते.
बांग्लादेशचा ODI स्क्वॉड
तमीम इकबाल (कॅप्टन), लिट्टन दास, अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ होसेन, यासिर अली, मेहिदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद (दुखापत), हसन महमूद, इबादत होसेन, नसुम अहमद, महमूदुल्लाह, नजमुल होसेन शंटो, काजी, नूरुल हसन सोहन, शोरीफुल हसन (बॅकअप).