IND vs BAN, 1st Test : बांग्लादेश विरुद्ध पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग XI कशी असेल? 2 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार

IND vs BAN, 1st Test : बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया 3 फिरकी गोलंदाज खेळवण्याची शक्यता आहे. म्हणजे दोन वेगवान गोलंदाज खेळवणार. त्याशिवाय प्लेइंग इलेव्हनमध्ये असे 2 खेळाडू असतील, जे पहिल्यांदा बांग्लादेश विरुद्ध खेळताना दिसतील.

IND vs BAN, 1st Test : बांग्लादेश विरुद्ध पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग XI कशी असेल? 2 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार
Tema IndiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 12:02 PM

पाच महिन्याच्या मोठ्या गॅपनंतर टीम इंडिया पुन्हा एकदा रेड बॉल म्हणजे टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. बांग्लादेश विरुद्ध पहिली टेस्ट मॅच 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. सीरीजचा पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये होणार आहे. पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन काय असेल? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. बांग्लादेश विरुद्ध कुठले 11 खेळाडू मैदानात उतरतील?. अधिकृतपणे या प्रश्नाच उत्तर टॉसच्या वेळीच मिळेल. पण अनेक खेळाडूंना बांग्लादेश विरुद्ध पहिल्यांदा टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळेल, एवढ मात्र नक्की.

चेन्नईच्या खेळपट्टीचा अंदाज घेतला तर भारत 3 स्पिनर आणि 2 वेगवान गोलंदाजांच्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरेल. म्हणजे 6 फलंदाजांना संधी मिळेल. यात एक विकेटकीपर आहे. ऋषभ पंत टीममध्ये असण्याचा अर्थ असा आहे की, विकेटकीपर फलंदाज म्हणून तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. इंग्लंड विरुद्ध देशांतर्गत टेस्ट सीरीजमध्ये छाप उमटवणाऱ्या ध्रुव जुरेलला बेंचवरच बसावं लागेल.

कशी असेल बॅटिंग ऑर्डर?

बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ओपनिंगला कॅप्टन रोहित शर्मासह डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल उतरेल. त्यानंतर वनडाऊन शुभमन गिल येऊ शकतो. त्यानंतर विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत येतील.

तिसरा फिरकी गोलंदाज कोण असेल?

गोलंदाजीबद्दल बोलायच झाल्यास चेन्नईत अश्विन आणि जाडेजाला भारतीय थिंक टँकची पहिली पसंती असेल. तिसऱ्या फिरकी गोलंदाजाच्या जागेसाठी अक्षर पटेल ऐवजी कुलदीप यादवला पसंती मिळू शकते. टीम इंडिया ज्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी देईल, त्यात जसप्रीत बुमराह आणि दुसरा मोहम्मद सिराज असेल.

टीम इंडिया ज्या प्लेइंग इलेवनसोबत उतरणार, त्यात 2 खेळाडूंना पहिल्यांदाच बांग्लादेश विरुद्ध टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळू शकते. यात एक नाव जसप्रीत बुमराहच आहे.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असेल?

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.