IND vs BAN: दुसऱ्या टेस्टआधी टीम इंडियासमोर दुहेरी संकट, प्रमुख खेळाडूला दुखापत
IND vs BAN: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत.
ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडिया संकटात सापडली आहे. रोहितच्या जागी बदली कर्णधार केएल राहुलला दुखापत झालीय. नेट्समध्ये सराव सत्रादरम्यान केएल राहुलच्या हाताला दुखापत झाली. दुसरा कसोटी सामना मीरपूर येथे होणार आहे. या दुखापतीमुळे टीम इंडियासमोर अडचण निर्माण झालीय.
…तर कॅप्टनशिप आणि ओपनिंगची समस्या
टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोर यांच्यामते केएल राहुलला झालेली दुखापत फार गंभीर नाहीय. राहुल दुसऱ्या कसोटीसाठी फिट असेल किंवा नाही, याबद्दल त्यांनी काही स्पष्ट केलेलं नाही. राहुल दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नाही, तर कॅप्टनशिप आणि ओपनिंगची समस्या निर्माण होऊ शकते.
तो फिट व्हावा, एवढीच अपेक्षा
नेट्समध्ये फलंदाजी करत असताना केएल राहुलला दुखापत झाली होती. राहुलच्या हाताला दुखापत झालीय. टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोर यांनी राहुलच्या दुखापतीबद्दल अपडेट दिली आहे. “राहुल सध्या व्यवस्थित दिसतोय. सर्व चांगलं होईल अशी अपेक्षा आहे. सध्या तो डॉक्टरच्या देखरेखीखाली आहे. दुसऱ्या कसोटीसाठी तो फिट राहील अशी अपेक्षा आहे” असं विक्रम राठोर म्हणाले.