IND Vs BAN: प्रतिष्ठा पणाला, टीममध्ये होणार कुलदीप-इशानची एंट्री, कशी असेल Playing XI?
IND Vs BAN: तिसऱ्या वनडेत निश्चित बदल होतील. काही युवा तडफदार खेळाडूंना संधी मिळेल, कोण असतील ते?
ढाका: वनडे सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. आता क्लीन स्वीपची नामुष्की टाळण्यासाठी टीम इंडियाकडे शेवटची संधी आहे. पहिल्या दोन वनडे सामन्यात टीम इंडिया लौकीकाला साजेशी कामगिरी करु शकली नाही. आता टीम इंडिया पराभवाच्या त्या कटू आठवणी मागे सोडून चांगल प्रदर्शन करण्यात यशस्वी होईल का? हा प्रश्न आहे. टीम इंडियाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे टीम प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करणार?. बदल होणार हे निश्चित आहे. पण कोणाला संधी मिळणार? हे समजून घेणं महत्त्वाच आहे.
‘या’ खेळाडूंना दुखापती
चटगांवमध्ये शनिवारी 10 डिसेंबरला वनडे सीरीजचा शेवटचा सामना आहे. या मॅचसाठी टीम इंडियामध्ये काही बदल होतील. खेळाडूंच्या दुखापतीमुळे हे बदल होणार आहेत. कॅप्टन रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज दीपक चाहरला दुसऱ्या वनडेमध्ये दुखापत झाली होती. पहिल्या वनडेमध्ये डेब्यु करणारा कुलदीप सेनही दुखापतीमुळे बाहेर गेलाय. त्याशिवाय अक्षर पटेलच्या फिटनेसबद्दलही प्रश्नचिन्ह आहे.
ओपनिंगसाठी रोहितच्या जागी कोणाला मिळणार संधी?
ओपनिंगपासून बदलाची सुरुवात होईल. शिखर धवनची साथ द्यायला इशान किशन आणि केएल राहुलपैकी एक जण मैदानात उतरेल. दुसऱ्या वनडे रोहितला दुखापत झाली. त्यावेळी सुद्धा राहुल मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी आला होता. त्यामुळे उद्याच्या मॅचमध्येही राहुल त्याच स्थानावर येईल. इशान किशन सलामीला येऊ शकतो.
रजत पाटीदार-राहुल त्रिपाठी कोणाला मिळणार संधी?
केएल राहुल ओपनिंगला आला, तर मिडल ऑर्डरमध्ये रजत पाटीदार किंवा राहुल त्रिपाठी यापैकी एका खेळाडूला संधी मिळू शकते. ते टीमसोबत आहेत. पण त्यांना अजून संधी मिळालेली नाही.
गोलंदाजी विभागात खरी परीक्षा
टीम इंडियाला मोठा निर्णय गोलंदाजी विभागात घ्यायचा आहे. मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक या पेस बॉलर्सच खेळणं निश्चित आहे. दोघांनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. पण शेवटच्या ओव्हर्समध्ये दोघेही महागडे ठरले होते. जोडी फोडण्यात त्यांना यश मिळालं नव्हतं. पण तरीही दोघांना संधी मिळेल. कारण पर्यायच नाहीयत. शार्दुल ठाकूरच्या रुपात तिसरा गोलंदाज आहे.
कुलदीपची एंट्री
आता प्रश्न हा आहे, की चार स्पिनर्सपैकी संधी कोणाला मिळणार?. बीसीसीआयने फक्त या मॅचसाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा टीममध्ये समावेश केलाय. त्याला संधी मिळण्याचे ते संकेत आहेत. भारतीय गोलंदाज सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट घेतल्यानंतर मधल्या ओव्हर्समध्ये विकेट काढण्यात कमी पडले होते. हे सुद्ध कुलदीपच्या समावेशामागच एक कारण आहे. वॉशिंग्टन सुंदर सोबत कुलदीप यादव खेळू शकतो.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक,