IND vs BAN 1st Test: 6 खेळाडू होणार बाहेर, जाणून घ्या टीममध्ये कोणाला मिळणार स्थान?
IND vs BAN 1st Test: कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11
ढाका: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये बुधवारपासून चट्टोग्राममध्ये पहिला कसोटी सामना सुरु होत आहे. टीम इंडियासाठी ही सीरीज महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही सीरीज जिंकण्यासाठी आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेल. आता प्रश्न हा आहे की, या सीरीजचा पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी कुठल्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल. युवा खेळाडूंना या सीरीजमध्ये संधी मिळेल?. टीम इंडियाची फलंदाजी सेट आहे, पण गोलंदाजी कॉम्बिनेशन काय असेल? टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन काय असेल? एक नजर मारुया.
ओपनिंगला कोण येणार?
रोहित शर्मा दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना खेळत नाहीय. त्यामुळे केएल राहुलसोबत शुभमन गिल ओपनिंगला येईल. गिलने अलीकडेच वनडे फॉर्मेटमध्ये सरस कामगिरी केली होती. टेस्टमध्ये सुद्धा त्याला सलामीला येण्याचा चांगला अनुभव आहे. राहुलसोबत गिल ओपनिंगला येईल. तिसऱ्या क्रमांकावर उपकर्णधार चेतेश्वर पुजारा येईल.
मीडल ऑर्डरमध्ये कोण येणार?
टीम इंडियाच्या मीडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर आहेत. ऋषभ पंत विकेटकीपिंगची जबाबदारी संभाळेल. पंत चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय. पण त्याचा टेस्ट रेकॉर्ड कमालीचा आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचं स्थान पक्क आहे. केएस भरत विकेटकीपर आहे. पण तो बेंचवरच दिसेल.
गोलंदाजी कॉम्बिनेशन काय असेल?
टीम इंडियाच पाच गोलंदाजांसह मैदानात उतरेल. यात अक्षर पटेल, अश्विन यांची ऑलराऊंडरची भूमिका असेल. मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर वेगवान गोलंदाजीचा भार संभाळतील. शार्दुलही चांगली फलंदाजी करतोय.
हे 6 खेळाडू बेंचवर बसतील: कुलदीप यादव, केएस भरत, अभिमन्यु ईश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार आणि जयदेव उनाडकट यांना संधी मिळणं कठीण आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल, (कॅप्टन) शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, उमेश यादव.