IND vs ENG 1st ODI: बुमराह-शमी जोडीने इंग्लंडची वाट लावली, टेस्टचे हिरो वनडेत झीरो, VIDEO
IND vs ENG 1st ODI: ओव्हलच्या (Oval) स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) पहिला वनडे सामना सुरु आहे. पहिल्या पाच षटकातच जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) आणि मोहम्मद शमी या भारताच्या जोडगळीने इंग्लंडला धक्के दिले आहेत.
मुंबई: ओव्हलच्या (Oval) स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) पहिला वनडे सामना सुरु आहे. पहिल्या पाच षटकातच जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) आणि मोहम्मद शमी या भारताच्या जोडगळीने इंग्लंडला धक्के दिले आहेत. इंग्लंडचे टॉप ऑर्डरचे अव्वल तीन फलंदाज या दोघांसमोर सपशेल अपयशी ठरले. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराह-शमी जोडीने कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच ओव्हर मध्ये इंग्लंडला दोन धक्के दिले. जेसन रॉयला भोपळाही फोडू न देता माघारी परतवले. तीच गत ज्यो रुटची केली. ज्यो रुटला खातही उघडू दिलं नाही, ऋषभ पंतकरवी त्याला झेलबाद केलं. इंग्लंडची दोन बाद 6 अशी स्थिती होती.
बुमराह-शमीने वाट लावली
त्यानंतर पुढच्याच तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने धक्का दिला. त्याने बेन स्टोक्सला शुन्यावरच ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. सहाव्या षटकात बुमराहने जॉनी बेयरस्टोला 7 धावांवर माघारी धाडलं. ऋषभ पंतकडे झेल द्यायला लावला. ओव्हलची खेळपट्टी सुरुवातीच्या षटकात गोलंदाजांना अनुकूल वाटतेय. या पीच वर चेंडूला उसळी मिळतेय. त्याचा भारतीय गोलंदाज फायदा उचलताना दिसतायत. आजच्या सामन्यात ग्रोइनच्या दुखापतीमुळे विराट कोहली खेळत नाहीय. पहिल्या पाच षटकातच बुमराह-शमी जोडीने इंग्लंडची वाट लावलीय. पाच षटकांअखेरीस इंग्लंडची स्थिती 3 बाद 17 धावा होती. आता कॅप्टन जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोनची जोडी मैदानात आहे.
A dream start for India.
Scorecard/clips: https://t.co/CqRVzsJNwk
??????? #ENGvIND ?? pic.twitter.com/2Kp8YLEZLW
— England Cricket (@englandcricket) July 12, 2022
भारताचा आत्मविश्वास उंचावला
टी 20 सीरीज मधील विजयाने टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसऱ्याबाजूला यजमान इंग्लंडचा संघ टी 20 सीरीज मधील पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. इंग्लंड यावेळी मजबूत संघ मैदानात उतरवणार आहे. त्यामुळे पहिल्या वनडे मध्ये विजय मिळवणं, टीम इंडियासाठी टी 20 इतकं सोपं नसेल. इंग्लंडचे अनेक सीनियर खेळाडू मैदानावर उतरतील. यात जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट आणि बेन स्टोक्स यांचा समावेश आहे. जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोनही या टीम मध्ये आहेत.