IND vs ENG 1st ODI: ओव्हलच्या खेळपट्टीवर धुमाकूळ घालणाऱ्या Jasprit Bumrah ला ECB चा सलाम, दिलं आयुष्यभरासाठी ‘स्पेशल गिफ्ट’

IND vs ENG 1st ODI: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) यापुढे 12 जुलैचा दिवस विशेष असेल. त्याने काल ओव्हलच्या खेळपट्टीवर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला.

IND vs ENG 1st ODI: ओव्हलच्या खेळपट्टीवर धुमाकूळ घालणाऱ्या Jasprit Bumrah ला ECB चा सलाम, दिलं आयुष्यभरासाठी 'स्पेशल गिफ्ट'
jasprit-bumrahImage Credit source: AP
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 12:25 PM

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) यापुढे 12 जुलैचा दिवस विशेष असेल. त्याने काल ओव्हलच्या खेळपट्टीवर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. त्याच्या आग ओकणाऱ्या चेंडूं समोर इंग्लिश फलंदाजांनी (IND vs ENG) गुडघे टेकले. इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्टीकडून साथ मिळताच जसप्रीत बुमराहने आपला रुद्रावतार दाखवला. त्याची गोलंदाजी खेळणं, इंग्लिश फलंदाजांना जमलच नाही. चेंडूचा वेग, अचूक टप्पा आणि स्विंग होणाऱ्या बुमराहच्या चेंडूंनी इंग्लिश फलंदाजांना सळो की, पळो करुन सोडलं. जेसन रॉय, (Jason Roy) जॉनी बेयरस्टो आणि ज्यो रुट हे फक्त कागदी वाघ ठरले. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर त्यांची बोलती बंद झाली. बेयरस्टो आणि रुटने एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. काल पहिल्या वनडेत हे दोन्ही फलंदाज जसप्रीत बुमराह समोर फेल ठरले. बुमराहने जणू या दोघांकडून एजबॅस्टन कसोटीतील पराभवाचा बदलाच घेतला.

सबकुछ जसप्रीत बुमराह

जेसन रॉयला शुन्यावर बोल्ड केलं. बेयरस्टोला अवघ्या 7 आणि रुटला भोपळाही फोडू न देता ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. आयपीएलमध्ये गरजलेलं लियाम लिव्हिंगस्टोन नावाचं वादळ बुमराहसमोर शांत झालं. बुमराहने त्याल परफेक्ट यॉर्कर टाकून शुन्यावर बाद केलं. डेविड विली आणि ब्रायडन कार्सी या इंग्लंडच्या वळवळणाऱ्या शेपटाचा खेळही बुमराहनेच संपवला. 7.2 षटकात 3 निर्धाव 19 धावा 6 विकेट असं बुमहारच्या गोलंदाजीच पृथक्करण होतं. पहिल्याडावात सबकुछ जसप्रीत बुमराह असंच चित्र होतं.

हे सुद्धा वाचा

ECB कडून स्पेशल गिफ्ट

त्याने इंग्लंडच्या फलंदाजीचा कणाच मोडून टाकला. त्याने पहिल्या स्पेल मध्येच इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. जसप्रीत बुमराह किती धोकादायक आहे, ते काल इंग्लंडला लक्षात आलं असेल. बुमराह सारखा खेळाडू कुठल्याही सामन्यात एका स्पेल मध्ये चित्र बदलू शकतो. कालच्या सामन्यात हेच दिसलं. जसप्रीत बुमराहच्या या कामगिरी इंग्लिश क्रिकेट बोर्डाने सुद्धा दखल घेतली. त्याच्या कामगिरीचा विशेष भेट देऊन सन्मान केला. जसप्रीत बुमराहने काल ज्या चेंडूने ओव्हलच्या खेळपट्टीवर हाहाकार उडवून दिला, तोच चेंडू ECB ने बुमराहला गिफ्ट म्हणून दिला. बुमराहला ईसीबीने अशी वस्तू भेट म्हणून दिलीय, ज्याचा त्याला आयुष्यभर अभिमान वाटेल. तो अभिमानाने ते गिफ्ट इतरांना दाखवेल. निवांतक्षणी तो चेंडू पाहिल्यानंतर आपसूकच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू येईल. त्याला स्वत:चाच काही क्षणांसाठी अभिमान वाटेल.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.