IND vs ENG: Rohit sharma गुरुवारी पहिला टी 20 सामना खेळणार? BCCI च्या उत्तराने वाढवला गोंधळ
IND vs ENG: हा कसोटी सामना झाल्यानंतर गुरुवार म्हणजे 7 जुलैपासून भारत-इंग्लंडमध्ये टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या टी 20 सीरीजसाठी रोहित शर्मा (Rohit sharma) कॅप्टन आहे.

मुंबई: एजबॅस्टन येथे भारत-इंग्लंडमध्ये (IND vs ENG) सुरु असलेल्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज ही कसोटी निकाली निघेल. इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची, तर भारताला 7 विकेटची आवश्यकता आहे. जो संघ सरस खेळेल, तो विजेता ठरेल. हा कसोटी सामना झाल्यानंतर गुरुवार म्हणजे 7 जुलैपासून भारत-इंग्लंडमध्ये टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या टी 20 सीरीजसाठी रोहित शर्मा (Rohit sharma) कॅप्टन आहे. पण पहिल्या टी 20 मध्ये त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. रोहित शर्माला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्याआधी सराव सामन्यात कोरोनाची (Corona virus) लागण झाली होती. आता त्यातून तो बरा झालाय. पण त्याच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह आहे. रोहित शर्माने नेट्स मध्ये सराव सुरु केलाय. स्वत: बीसीसीआयने त्याची क्लिप पोस्ट केली आहे. रोहित पूर्णपणे रिकव्हर झालाय का? साऊथम्पटन येथे होणाऱ्या पहिल्या टी 20 मध्ये तो खेळणार का? त्यावर बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच उत्तर संशय निर्माण करणारं आहे.
त्याने ट्रेनिंग सुरु केलीय
“त्याला कोविडची लागण झाली होती. त्याला रिकव्हर होण्यासाठी वेळ लागेल. त्याने ट्रेनिंग सुरु केलीय. पण तो पहिला टी 20 सामना खेळणार की, नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. कोच आणि स्वत: रोहित या बद्दल निर्णय घेईल. तो तयार असेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे” असं बीसीसीआय पदाधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं.
रोहितला आता बरं वाटतय, पण….
कोविड 19 ची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर रोहितने सराव सुरु केला. रविवारी तो पहिल्यांदा सराव सत्रात सहभागी झाला होता. त्यानंतर सोमवारी सुद्धा त्याने सराव केला. इंग्लंडमधून जी माहिती मिळतेय, त्यानुसार रोहितला आता बरं वाटतय. पण तो पूर्णपणे तंदुरुस्त नाहीय.



रोहित किती मिनिटं नेट मध्ये होता?
सोमवारी रोहित 45 मिनिटं नेट मध्ये होता. त्याने फिल्डिंगचा सराव केला. पण सामन्याच्यावेळी चार तास मैदानात रहाण्याइतका तो फिट आहे का? या बद्दल साशंकता आहे. संघ व्यवस्थानपन रोहितला खेळवण्याचा धोका पत्करेल का?. त्यांनी रोहितला विश्रांती दिल्यास आश्चर्य वाटणार नाही.