भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ गारद, आता फलंदाजांची कर्तबगारी दाखवण्याची पारी
India vs England 1st Test Day 1 Live Score: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आजचा पहिला दिवस हा भारतीय चाहत्यांसाठी चांगलाच रोचक ठरला. कारण भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे मातब्बर फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाहीत.
Ind vs Eng 1st Test, Day 1 : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आजचा पहिला दिवस हा भारतीय चाहत्यांसाठी चांगलाच रोचक ठरला. कारण भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे मातब्बर फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाहीत. अखेर भारतीय गोलंदाजांनी त्यांना 66 षटकात थांबवलं. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव हा 65.4 षटकात 10 बाद 183 धावांवर थांबला. टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ मोहम्मद शमीने 3 तर शार्दुल ठाकूरने 2 आणि मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली. त्यानंतर भारतीय संघाचे सलामीवर रोहित शर्मा आणि के एल राहुल पहिल्या डावासाठी मैदानावर उतरले. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने एकही बळी न जाऊ देता 13 षटकात 21 धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. त्यातील पहिल्या सामन्याचा पहिला दिवस बुधवारी (4 ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करत आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने धमाकेदार सुरुवात करत इंग्लंडच्या सलामीवर फलंदाजाला शून्यावर तंबूत धाडलं. त्यानंतर काही काळ भारताला विकेट मिळाला नाही. पण संघात पुनरागमन केलेल्या सिराजने क्रॉलीला बाद करत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. लंचनंतर शमीने देखील सामन्यातील पहिला विकेट पटकावत सिबलीला तंबूत धाडलं.
इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिबली हे सलामीसाठी मैदानात उतरले. मात्र टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला झटका दिला. बुमराहच्या बोलवर बर्न्स हा पायचित पडला. विशेष म्हण बर्न्स पाच चेंडू खेळला. पण त्याला एकही धाव घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे तो शून्यावरच तंबूत परतला. त्यानंतर झॅक क्रॉले हा मैदानात आला. क्रॉले याने सिबलीसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 20 व्या षटकात सिराजच्या चेंडूवर यष्टीरक्षक ऋषभ पंतने त्याचा झेल टिपला. त्यामुळे तो झेलबाद झाला. क्रॉले याने 27 धावा केल्या. यामध्ये 4 चौकारांचा समावेश होता. इंग्लंडच्या या दोन विकेटनंतर लंचब्रेक झाला.
लंचब्रेकनंतर टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीनेदेखील खातं उघडलं. शमीने डॉमिनिक सिबली याला झेलबाद केलं. सिबलीने 2 चौकारांसह 18 धावा केल्या. त्यानंतर जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ते मैदानावर तग धरुन खेळत राहिले. पण अखेर मोहम्मद शमीने ही जोडी फोडली. शमीने बेअरस्टोला पायचित पकडले. त्यामुळे बेअरस्टोला 29 धावांवर समाधान मानावे लागले. रुट आणि बेअरस्टो यांनी 72 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रुटने आपले अर्धशतक साजरी केले. शार्दुल ठाकूरने त्याला अखेर पायचित पकडत बाद केलं. रुटने 64 धावा केल्या. यामध्ये तब्बल 11 चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर काही धावांच्या फरकावर एकामागे एक असे ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन बाद झाले. अखेर 65.4 षटकात इंग्लंडचा पूर्ण संघ 183 धावात तंबूत परतला.
Key Events
भारतासाठी ही मालिका तशी अवघड आहे. कारण आतापर्यंतचा दोन्ही संघांचा कसोटी इतिहास पाहिल्यास इंग्लंडची मक्तेदारी सहज दिसून येते. गेल्या 10 वर्षात भारतीय संघाचा सर्वाधिक पराभव हा इंग्लंडमध्येच झाला आहे. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये 10 वर्षांत 15 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 12 सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. तर केवळ दोनच सामन्यात भारताला विजय मिळाला आहे.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील खेळाडूंना दुखापतीसह इतर कारणांमुळे सामन्यांना मुकावे लागत आहे. दुखापतीमुळे भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांना सामन्याला मुकावे लागले. तर इंग्लंडचा बेन स्टोक्स खाजगी कारणामुळे आणि ओली पोप दुखापतीमुळे सामन्यात खेळताना दिसणार नाही.
LIVE Cricket Score & Updates
-
इंग्लंडचा पहिला डाव 183 धावांवर आटोपला, भारतीय डावाला सुरुवात
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आजचा पहिला दिवस हा भारतीय चाहत्यांसाठी चांगलाच रोचक ठरताना दिसतोय. कारण भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे मातब्बर फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाहीत. अखेर भारतीय गोलंदाजांनी त्यांना 66 षटकात थांबवलं. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव हा 65.4 षटकात 10 बाद 183 धावांवर थांबला. त्यानंतर आता भारतीय संघाचे सलामीवर रोहित शर्मा आणि के एल राहुल मैदानावर उतरले.
-
इंग्लंडला 9 वा झटका, स्टुअर्ट ब्रॉड बाद
इंग्लंडला 9 वा झटका, स्टुअर्ट ब्रॉड बाद, त्याने 3 चेंडूत 4 धावा
-
-
इंग्लंडला सातवा झटका, जो रुट बाद
इंग्लंडला सातवा झटका, जो रुट बाद, रुटने 108 चेंडूत 64 धावा केल्या
-
इंग्लंडला पाचवा धक्का, लॉरेन्स बाद
इंग्लंडला पाचवा धक्का, लॉरेन्स बाद, विशेष म्हणजे शमीनेच त्याला शून्यावर तंबूत पाठवलं आहे. त्यामुळे इंग्लंडच्या 138 धावांवर 5 विकेट झाल्या आहेत.
-
इंग्लंडला चौथा झटका, जॉनी बियरस्टो पायचीत
इंग्लंडला चौथा झटका, जॉनी बियरस्टो पायचीत, भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीच्या खेळीपुढे इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू फेल, इंग्लंडच्या 138 धावांवर 4 विकेट
-
-
IND vs ENG : इंग्लंडला तिसरा झटका, सिबलीही बाद
लंचनंतर काही वेळातच भारताने इंग्लंडला आणखी एक झटका दिला दिला आहे. मोहम्मद शमीने सामन्यातील पहिला बळी घेत सिबली याला 18 धावांवर बाद केलं आहे. इंग्लंडचे 67 धावांवर 3 गडी तंबूत परतले आहेत.
-
लंचपर्यंत भारतीय संघाचं सामन्यावर वर्चस्व
पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशन संपलं आहे. भारताने या सेशनमध्ये भेदक गोलंदाजी करत सामन्यात दबदबा निर्माण केला आहे. भारतीय गोलंदाजानी रॉरी आणि क्रॉली या दोघा इंग्लंडच्या सलामीवीरांना तंबूत धाडत इंग्लंडची 61 धावावंर 2 विकेट अशी अवस्था केली आहे. बुमराह आणि सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
Lunch on Day 1 of the 1st Test.
Bumrah and Siraj pick a wicket apiece in the morning session.
Scorecard – https://t.co/TrX6JMiei2 #ENGvIND pic.twitter.com/Uc69T23VTj
— BCCI (@BCCI) August 4, 2021
-
IND vs ENG : रूटची चौकारांची हॅट्रिक
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने फलंदाजीला येकत अप्रतिम तीन सलग चौकार ठोकले. नुकतीच विकेट मिळवलेल्या मोहम्मद सिराजला रुटने हे चौकार खेचले.
-
IND vs ENG : इंग्लंडचा क्रॉली बाद
शून्यावर पहिली विकेट गेल्यानंतर इंग्लंड संघाचा खेळ सांभाळत असलेल्या क्रॉलीला बाद करण्यात भारताला यश आलं आहे. संघात पुनरागमन केलेल्या सिराजच्या चेंडूवर यष्टीरक्षक पंतने क्रॉलीचा झेल टीपला आहे.
WICKET!@mdsirajofficial picks up his first wicket on English soil.
A late review and it’s a successful one as Crawley departs for 27.
Live – https://t.co/TrX6JMiei2 #ENGvIND pic.twitter.com/mGCrFSNbeG
— BCCI (@BCCI) August 4, 2021
-
महिला हॉकी – भारतीय महिला पराभूत
अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय महिलांना केवळ एकच गोल करता आल्याने अर्जेंटीना संघ विजयी झाला आहे.
A spirited performance from the Indian Women’s Team but we go down fighting against Argentina. ?#ARGvIND #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/PsJZhyjwnQ
— Hockey India (@TheHockeyIndia) August 4, 2021
-
IND vs ENG : इंग्लंडकडून सामन्यातील पहिला चौकार
इंग्लंडच्या क्रॉलीने सामन्यातील पहिला चौकार लगावला आहे. जसप्रीतच्या 7 व्या ओव्हरला त्याने हा चौकार मारला आहे.
1st Test. 6.4: J Bumrah to Z Crawley (11), 4 runs, 12/1 https://t.co/TrX6JMiei2 #ENGvIND
— BCCI (@BCCI) August 4, 2021
-
भारतीय महिला संघाची सेमीफायनलही सुरु
नॉटिंघमपासून हजारों मैल दूर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिनी हॉकी स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सेमीफायनलचा सामना खेळत आहेत. भारत आणि अर्जेंटीना यांच्यात सुरु असलेल्या या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स तुम्ही TV9 च्या ओलिम्पिक लाइव ब्लॉग लिंकवर पाहू शकता.
-
IND vs ENG : इंग्लंडला पहिला झटका
भारतीय संघाने धमाकेदार सुरुवात करत इंग्लंड संघाचा सलामीवीर रॉरी बर्न्सला शून्यावर तंबूत धाडलं आहे. जसप्रीत बुमराहने त्याला पायचीत केलं आहे.
O. U. T.! ☝️
Early strike for #TeamIndia, courtesy @Jaspritbumrah93! ? ?
England lose Rory Burns in the first over. #ENGvIND
Follow the match ? https://t.co/TrX6JMzP9A pic.twitter.com/KiArVnKSSE
— BCCI (@BCCI) August 4, 2021
-
महिला हॉकी – भारत विरुद्ध अर्जेंटीना सामना सुरु
भारत आणि अर्जेंटीना संघात सेमीफायलच्या सामन्याला सुरुवात झाली असून भारतीय महिलांनी काही मिनिटांतच पहिला गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली आहे. गुरजीत कौरने पहिला गोल केला आहे.
2′ Gurjit Kaur you BEAUTTYYYYY! ?
She converts India’s first Penalty Corner into a goal inside the first two minutes. ?
?? 0:1 ??#ARGvIND #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/n3Hbxm2O2q
— Hockey India (@TheHockeyIndia) August 4, 2021
-
IND vs ENG : दोन्ही संघाचे अंतिम 11
भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
इंग्लंड संघ – आर. बर्न्स, डी. सिबले, क्रॉली, जो रुट, जॉनी बेयरस्टो, डी. लॉरेन्स, जॉस बटलर, सॅम करन, ओ. रॉबिनसन, स्टुवर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन
-
IND vs ENG : भारतीय संघात राहुल आणि शार्दुलची एंट्री
भारतीय कर्णधार विराट कोहलीने संघात काही बदल करत केएल राहुल आणि शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले आहे. सोबतच रवींद्र जाडेजा एकमेव स्पिनर असून मोहम्मद सिराज आश्विनच्या जागी खेळणार आहे.
-
IND vs ENG : इंग्लंडचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय
नॉटिंघममध्ये थोड्याच वेळात भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याला सुरुवात होत असून इंग्लंडने टॉस जिंकला आहे. इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय़ घेतल्याने भारताकडे गोलंदाजी आली आहे.
1st Test. England win the toss and elect to bat https://t.co/TrX6JMiei2 #ENGvIND
— BCCI (@BCCI) August 4, 2021
-
IND vs ENG : भारत आणि इंग्लंडमध्ये ‘Test Cricket Fight’
??????? Player 1 ?? Player 2
GO! ?#ENGvIND | #WTC23 pic.twitter.com/q2AQ4J9Myi
— ICC (@ICC) August 4, 2021
Published On - Aug 04,2021 3:00 PM