IND vs ENG 2nd ODI: ‘मला समजत नाही भाई….’ विराट कोहलीच्या प्रश्नावर वैतागला रोहित शर्मा, पहा VIDEO
IND vs ENG 2nd ODI: लॉर्ड्सवरच्या (Lords) दुसऱ्या सामन्यानंतर काल पत्रकार परिषद झाली. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit sharma) संतापल्याचं दिसल.
मुंबई: लॉर्ड्सवरच्या (Lords) दुसऱ्या सामन्यानंतर काल पत्रकार परिषद झाली. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit sharma) संतापल्याचं दिसल. पत्रकार सातत्याने रोहितला विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मवरुन प्रश्न विचारत होते. त्यामुळे रोहित सततच्या या प्रश्नांवर वैतागला, चि़डला होता. गुरुवारी दुसऱ्या वनडे मध्ये इंग्लंडने भारतावर तब्बल 100 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. चेहऱ्यावरची ती निराशा रोहितला लपवता येत नव्हती. त्यात पत्रकार त्याला सतत विराटच्या फॉर्मवरुन प्रश्नांची सरबत्ती करत होते. त्यामुळे रोहित शर्मा वैतागला, चि़डला होता. विराट कोहली कालच्या सामन्यात सुद्धा अपयशी ठरला. त्याने तीन चौकार ठोकले. पण तो 16 धावांवर बाद झाला. इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सीरीज मध्येही विराट फ्लॉप होता. त्याआधी एजबॅस्ट कसोटीतही हीच स्थिती होती. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याची मागणी होत आहे. कालच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या या प्रश्नांच्या भडीमाराला रोहित कंटाळल्याच दिसलं.
वारंवार यावरच चर्चा का होतेय?
“वारंवार यावरच चर्चा का होतेय? म्हणजे, मला समजत नाही भाई. विराटने इतक्या धावा केल्या आहेत, त्याची सरासरी बघा. त्याने किती शतकं ठोकली आहेत. त्याच्याकडे मोठा अनुभव आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात उतरणीचा काळ येतो. व्यक्तीगत आयुष्यातही अशी वेळ येते” असं रोहित शर्मा एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.
Rohit Sharma again backed Virat Kohli. Great gesture by Skipper. pic.twitter.com/C8HEYnajgj
— Rohit Sharma Fanclub India (@Imro_fanclub) July 15, 2022
याआधी सुद्धा रोहितने विराटला सपोर्ट् केलाय
याआधी सुद्धा टी 20 सीरीज संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने विराट कोहलीला सपोर्ट केला होता. आता सुद्धा रोहितने विराटला सपोर्ट केलाय. कालच्या सामन्यात इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची टॉप ऑर्डर कोसळली. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि ऋषभ पंत फ्लॉप ठरले. रोहित 10 चेंडू खेळला पण खातही उघडू शकला नाही. शिखर धवनने 26 चेंडूत 9 धावा केल्या. कोहलीने 25 चेंडूत 16 धावा. पंत 5 चेंडू खेळून शुन्यावर आऊट झाला.