AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचे ‘हे’ दोन खेळाडू विश्वक्रिकेटमध्ये आपली सत्ता गाजवतील, वीरेंद्र सेहवाग याची मोठी भविष्यवाणी

IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने दोन खेळाडूंबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. हे दोन्ही खेळाडू भारतीय असून नेमके ते कोण आहेत जाणून घ्या.

टीम इंडियाचे 'हे' दोन खेळाडू विश्वक्रिकेटमध्ये आपली सत्ता गाजवतील, वीरेंद्र सेहवाग याची मोठी भविष्यवाणी
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 6:49 PM

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात आघाडी घेतलीये. विशाखापटनम येथे हा सामना सुरू असून इंग्लंड संघाला आता  विजयासाठी 332 धावांची गरज तर टीम इंडियाला 9 विकेट घ्यायच्या आहेत. टीम इंडियाकडूना युवा खेळाडूंनीच या सामन्यात दमदार खेळी केली. याचाच धागा पकडत टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने  दोन खेळाडूंची नावं घेत मोठी भविष्यवाणी केलीये.

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

दुसऱ्या कसोटी सामन्यामधील द्विशतकवीर आणि शतकवीर खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. हे दोन खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसूव यशस्वी जयस्वाल तर दुसरा शुभमन गिल आहे. यशस्वी जयस्वाल याने पहिल्या डावात फलंदाजी करताना 209 धावांची द्विशतकी खेळी केली होती. दुसऱ्या डावामध्ये टीम इंडिया अडचणीत असताना शुबमन गिलने 104 धावांची शतकी खेळी केली. दोघांनी केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने मोठी आघाडी घेतली आहे.

वीरेंद्र सेहवाग याने दोघांचे फोटो शेअर करत, दोन्ही खेळाडूंना पाहून आनंद झाला. दोघेही 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळे येत्या दशकामध्ये त्यापेक्षा जास्त काळ दोघेही क्रिकेटविश्वात आपली सत्ता गाजवतील अशी शक्यता असल्याचं वीरेंद्र सेहवाग याने म्हटलं आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.