IND vs ENG | जिंकूनही राहुल द्रविड समाधानी नाहीत का? प्रामाणिकपणे त्यांनी मान्य केलं की….
IND vs ENG 2nd Test | टीम इंडियाने काल विशाखापट्टनम कसोटी जिंकली. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया पिछाडीवर पडली होती. टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने कसोटी जिंकली असली, तरी हेड कोच राहुल द्रविड फार खुश नाहीयत.
IND vs ENG 2nd Test | टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 107 धावांनी हरवलं. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या संपूर्ण कसोटी सामन्यात युवा खेळाडूंनी कमालीच प्रदर्शन केलं. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालच द्विशतक तर दुसऱ्याडावात शुभमन गिलची शतकी खेळी. त्याशिवाय जसप्रीत बुमराहच्या 9 विकेट्सनी भारताच्या विजयाच महत्त्वाच योगदान दिलं. युवा खेळाडूंच्या या प्रदर्शनावर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी एक वक्तव्य केलय.
दुसऱ्या कसोटीआधी शुभमन गिलच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. पण त्याने शतक ठोकून फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. “सकारात्मक खेळताना लोक काही चूका करतात. याला अचूक उत्तर नाहीय. अनेक युवा फलंदाज येत आहेत, जे कसोटी क्रिकेटच तंत्र आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काम प्रगती पथावर आहे. यात अजून सुधारण करु अशी अपेक्षा आहे” असं राहुल द्रविड म्हणाले. ‘खेळाडूंचा जो दृष्टीकोन आहेत, त्यात त्यांना संतुलन साधाव लागेल’ असं द्रविड म्हणाले.
प्रामाणिपकपणे द्रविड यांनी काय मान्य केलं?
यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात 209 धावा केल्या. भारताच्या जवळपास 53 टक्के धावा त्याने केल्या. जैस्वालने वयाच्या 22 व्या वर्षी बरीच परिपक्वता दाखवलीय. पण अन्य फलंदाज तितकी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. टीम इंडियाची धावसंख्या 400 पार जाऊ शकली नाही. राहुल द्रविड म्हणाले की, “आमच्याकडे बरेच युवा फलंदाज आहेत. टेस्ट क्रिकेट समजून घेण्यासाठी जास्त वेळ नाहीय. प्रामाणिपकपणे मला वाटतं की, दोन्ही इनिंगमध्ये आम्ही कमी धावा केल्या. 396 एक चांगली धावसंख्या आहे. तुम्ही टॉस जिंकल्यानंतर तुमच्याकडे डबल सेंच्युरी झळकवणारा प्लेयर आहे, असं असताना तुमची धावसंख्या 450-475 पर्यंत कशी पोहोचेल, याचा विचार केला पाहिजे”