IND vs ENG : ओली पोपचा फक्त 0.45 सेकंदात खेळ खल्लास! अश्विनच्या गोलंदाजीवर काही कळायच्या आतच तंबूत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांनी जबरदस्त खेळी केली. ओली पोपने पहिल्या कसोटीत टीम इंडियाचं स्वप्न भंग केलं होतं. पण दुसऱ्या कसोटीत पोपचा खेळ खल्लास झाला.

IND vs ENG : ओली पोपचा फक्त 0.45 सेकंदात खेळ खल्लास! अश्विनच्या गोलंदाजीवर काही कळायच्या आतच तंबूत
IND vs ENG : ओली पोपला 0.45 सेकंद पडली महागात, अश्विनच्या गोलंदाजीवर रोहितने दाखवला तंबूचा रस्ता
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 2:07 PM

मुंबई : भारत इंग्लंड दुसऱ्या कसोटीत टीम इंडियासमोर कमबॅक करण्याचं आव्हान होतं. पण टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत साजेशी कामगिरी केली. इंग्लंडला बॅकफूटवर ढकलण्यात टीम इंडियाला यश आलं. गोलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. आर अश्विन, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना दिवसा तारे दाखवले. विजयासाठी 399 धावांचं आव्हान इंग्लंसमोर होतं. पण बेझबॉल रणनितीमुळे कोणाचा विजय होईल हे काही सांगता येत नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी विकेट महत्त्वाचे होते. त्यात फॉर्मात असलेल्या फलंदाजांना बाद करण्याचं आव्हान होतंच. ओली पोपने पहिल्या कसोटी मोठी खेळी करत टीम इंडियाच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली होती. पण दुसऱ्या कसोटीत त्याला रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. पहिल्या डावात बुमराहने यॉर्कर अस्रावर त्याचा त्रिफळा उडवला होता. तर दुसऱ्या डावात आर अश्विनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. अवघ्या 0.45 सेंकदात त्याचा खेळ खल्लास झाला.

इंग्लंडच्या 2 गडी बाद 132 धावा झाल्या होत्या. झॅक क्राउले अर्धशतकी खेळी करत जम बसवून होता. तर ओली पोपच्या रुपाने डोकेदुखी वाढली होती. आर अश्विनने षटकाचा दुसरा चेंडू टाकला आणि काही कळायच्या आतच रोहित शर्माच्या हाती चेंडू बसला. फक्त 0.45 सेकंदात जे काही व्हायचं ते झालं. ओली पोपलाही विश्वास बसला नाही. पण रोहित शर्माने झेल घेतला हे त्याला स्वीकारावं लागलं आणि तंबूच्या दिशेने जावं लागलं. अश्विनला पहिल्या डावात एकही गडी बाद करता आला नव्हता. पण दुसऱ्या डावात अश्विनने कमाल केली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन खेळाडू

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.