IND vs ENG : इंग्लंडला ‘जैसबॉल’चं जोरदार प्रत्युत्तर, यशस्वीच्या द्विशतकी खेळीने पहिल्या डावात लगान वसूल
भारत इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवसावर मजबूत पकड मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी यात आणखी काही धावांची भर पडली. इंग्लंडच्या बेझबॉलला यशस्वी जयस्वालने जोरदार प्रत्युत्तर दिलं. द्विशतकी खेळी पहिल्या डावावर भारताला चांगली आघाडी मिळवून दिली.
मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने जबरदस्त कामगिरी केली. इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीला जोरदार प्रत्युत्तर दिलं. कसोटीत आक्रमक खेळी करत द्विशतकी खेळी केली. भारताने पहिल्या डावात केलेल्या धावांमध्ये निम्म्या धावा या एकमेव यशस्वी जयस्वालच्या आहे. एकीकडे धडाधड विकेट्स पडत असताना यशस्वी जयस्वालने एकहाती टीम इंडियाचा डाव सावरला. भारताला पहिल्या डावात मजबूत आघाडी मिळवून दिली. इंग्लंडचं प्रत्येक मारा त्याच वेगाने परतवून लावला. भारतीय क्रिकेट इतिहासात द्विशतकी खेळी करणारा तिसरा तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी विनोद कांबळीने दोन वेळा, तर सुनील गावस्कर यांनी एकदा अशी कामगिरी केली आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही त्याचा समावेश झाला आहे. वीरेंद्र सेहवाग, वसीम जाफर, शिखर धवन यांच्यानतर चौथा फलंदाज ठरला आहे.
यशस्वी जयस्वालच्या द्विशतकी खेळीने भारताने ४०० धावांचा पल्ला गाठला आहे. आता भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे. गोलंदाज पहिल्या डावात कशी कामगिरी करतील याकडे लक्ष लागून आहे. फिरकीपटू आर अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.