IND vs ENG 3rd ODI: इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, 30 ओव्हर्सनंतर अशी स्थिती

IND vs ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आज मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs ENG 3rd ODI: इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, 30 ओव्हर्सनंतर अशी स्थिती
Team india 2Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 5:59 PM

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आज मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. 30 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. 30 ओव्हर्स मध्ये इंग्लंडच्या पाच बाद 162 धावा झाल्या आहेत. 66 धावात इंग्लंडचे चार फलंदाज तंबूत परतले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना थोडा संघर्ष करावा लागला. कॅप्टन जोस बटलर (Jos buttler) आणि मोइन अलीची जोडी जमली होती. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. ही जोडी तापदायक ठरणार असं वाटत असतानाच, रवींद्र जाडेजाने कमाल दाखवली. त्याने 27 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोइन अलीला विकेटकीपर ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. पंतने स्टम्पसाठी जबरदस्त झेल घेतला. मोइन अलीने 44 चेंडूत 34 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 2 षटकार आहेत. आता लियाम लिव्हिंगस्टोन आणि जोस बटलरची जोडी मैदानात आहे.

इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो ही सलामीची जोडी मैदानात उतरली होती. रॉयने इंग्लंडला धडाकेबाज सुरुवात करुन दिली होती. त्याने पहिली ओव्हर टाकणाऱ्या मोहम्मद शमीच्या पहिल्या तीन चेंडूंवर चौकार खेचले. पण इंग्लंडच्या सलामीवीरांना ही लय टिकवता आली नाही. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. त्याने जॉनी बेयरस्टोला खातेही उघडू दिले नाही. श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केलं. त्याच षटकात ज्यो रुटची विकेटही सिराजने काढली. त्याने रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. रुटही भोपळा फोडू शकला नाही.

हार्दिकने फोडली जमलेली जोडी

इंग्लंडची अवस्था 2 बाद 12 झाली होती. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या बेन स्टोक्सने जेसन रॉय सोबत मिळून डाव सावरला. रॉय आणि स्टोक्सची जोडी जमली. दोघांनी तिसऱ्याविकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने अखेर ही जोडी फोडून भारताला तिसरं यश मिळवून दिलं. चांगली फलंदाजी करणाऱ्या जेसन रॉ़यने विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेल दिला. 31 चेंडूत 41 धावा करताना त्याने 7 चौकार लगावले. 14 व्या षटकात हार्दिकने बेन स्टोक्सलाही आऊट केलं. आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला. 15 षटकांअखेरीस इंग्लंडची धावसंख्या तीन बाद 80 होती.

ओल्ड ट्रॅफर्डचा रेकॉर्ड काय सांगतो?

मँचेस्टर बद्दल बोलायच झाल्यास, इथे टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी स्वीकारतो. या मैदानावर वनडे सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने 396 धावा केल्या होत्या. या मैदानावर भारताची सर्वाधिक धावसंख्या 336 आहे ‘

जसप्रीत बुमराह का खेळत नाहीय?

दुखापतीमुळे आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळत नाहीय. त्याच्याजागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्माने टॉसच्यावेळी बुमराह खेळत नसल्याची माहिती दिली. पाठिच्या दुखण्यामुळे बुमराह या मॅच मध्ये नाहीय. मालिकेचा निकाल निश्चित करणारी ही लढत आहे. भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड वर 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्सवर इंग्लंडने पलटवार केला. त्यांनी भारताचा 100 धावांनी पराभव केला. बंगाल,

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.