IND vs ENG, 3rd ODI: दुसरा सामना हरल्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी संघात बदल होणार? अशी असेल टीम इंडियाची Playing 11

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये उद्या मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे.

IND vs ENG, 3rd ODI: दुसरा सामना हरल्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी संघात बदल होणार? अशी असेल टीम इंडियाची Playing 11
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 3:37 PM

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये उद्या मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. मालिकेचा निकाल निश्चित करणारी ही लढत आहे. भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड वर 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्सवर इंग्लंडने पलटवार केला. त्यांनी भारताचा 100 धावांनी पराभव केला. त्यामुळे उद्याचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही टीम्स उद्या मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरतील. फक्त तिसऱ्या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) संघात काही बदल करणार का? हा प्रश्न आहे. सध्यातरी इतक्या महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात ते कुठलाही बदल करणार नाहीत, असंच दिसतय. विराट कोहली दोन्ही वनडेत अपयशी ठरला. पण संघ व्यवस्थापन पुन्हा विराटवरच विश्वास दाखवेल. दीपक हुड़्डा आणि श्रेयस अय्यर या दोघांना बाहेर बसवण्यात येईल.

तोच संघ कायम ठेवतील?

कुठलाही संघ विनिंग कॉम्बिनेशन कधी बदलत नाही. जिंकलेल्या संघाची लय बिघडवत नाही. भारताने दुसरा सामना गमावलाय. पण ते तोच संघ कायम ठेवतील. त्यामुळे खेळाडूंना अजून आत्मविश्वास मिळेल व चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल.

सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा विराट वर

ओल्ड ट्रॅफडवर पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. कॅप्टन रोहित शर्मा सातत्याने विराटची पाठराखण करतोय. उद्याच्या सामन्यात विराटची बॅट तळपणं आवश्यक आहे. विराट भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. या मॅच आधी विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात ‘मी पडलो, तर काय? ओह बट माय डार्लिंग, तू उडालास तर काय?’ असा संदेश त्यामध्ये आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.