IND vs ENG 3rd ODI: जाडेजाने ‘त्या’ दोन कॅच पकडून जिंकलं, पण भारताची खराब सुरुवात, VIDEO

IND vs ENG 3rd ODI: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) तिसऱ्या वनडे सामन्यात आज हार्दिक पंड्याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने आणि युजवेंद्र चहलने मिळून इंग्लंडचा खेळ बिघडवला.

IND vs ENG 3rd ODI: जाडेजाने 'त्या' दोन कॅच पकडून जिंकलं, पण भारताची खराब सुरुवात, VIDEO
JadejaImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 8:22 PM

मुंबई: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) तिसऱ्या वनडे सामन्यात आज हार्दिक पंड्याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने आणि युजवेंद्र चहलने मिळून इंग्लंडचा खेळ बिघडवला. इंग्लंडला निर्धारित 50 षटकं खेळता आली नाहीत. त्यांचा डाव 45.5 षटकात 259 धावात आटोपला. हार्दिक पंड्याने आज अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 24 धावा देत 4 विकेट काढल्या. यात तीन निर्धाव षटक होती. यावरुन हार्दिकच्या भेदक माऱ्याची कल्पना येते. हार्दिक पंड्याने (Hardik pandya) आज मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून दिले. एखादी महत्त्वाची पार्ट्नरशिप आकाराला येत असताना, त्याने विकेट काढले. इंग्लंडची अवस्था 2 बाद 12 झाली होती. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या बेन स्टोक्सने (Ben Stokes) जेसन रॉय सोबत मिळून डाव सावरला. रॉय आणि स्टोक्सची जोडी जमली. दोघांनी तिसऱ्याविकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने अखेर ही जोडी फोडून भारताला तिसरं यश मिळवून दिलं. चांगली फलंदाजी करणाऱ्या जेसन रॉ़यने विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेल दिला. 31 चेंडूत 41 धावा करताना त्याने 7 चौकार लगावले. जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोनची जोडी पंड्यानेच फोडली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली.

जाडेजाचे अप्रतिम झेल

बटलर आणि लिव्हिंगस्टोन भारतासाठी धोकादायक ठरु शकले असते. पण या दोन्ही विकेट पंड्याने एकाच ओव्हरमध्ये म्हणजे 37 व्या षटकात काढल्या. हे दोन्ही झेल मिडविकेटला रवींद्र जाडेजाने टिपले. जाडेजाने हे झेल घेताना, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला. इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक 60 धावा केल्या. यासाठी त्याने 80 चेंडू घेतले. यात 3 चौकार आणि 2 षटकार आहेत. मोइन अलीने (34), लियाम लिव्हिंगस्टोनने (27) आणि क्रेग ओव्हरटन (32) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळल्या केल्या. त्यामुळेच इंग्लंडला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला.

भारताची खराब सुरुवात

दरम्यान इंग्लंडने चांगली सुरुवात केली आहे. पाच षटकात भारताच्या दोन बाद 21 धावा झाल्या आहेत. दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन माघारी परतले आहेत. रोहित शर्मा चांगला खेळत होता. पण रीस टॉपलीच्या गोलंदाजीवर स्लीप मध्ये त्याने रुटकडे झेल दिला, रोहितने 17 चेंडूत 17 धावा केल्या. यात चार चौकार आहेत. शिखर धवन अवघ्या 1 रन्सवर टॉपलीच्या गोलंदाजीवरच झेलबाद झाला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.