Ind vs Eng : गणपती बाप्पा पावला, भारताच्या सर्व खेळाडूंचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, आजपासून पाचव्या कसोटीचा थरार

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याआधी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे टीम इंडियाचे सर्व खेळाडू पाचव्या कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे फिट आहेत.

Ind vs Eng : गणपती बाप्पा पावला, भारताच्या सर्व खेळाडूंचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, आजपासून पाचव्या कसोटीचा थरार
भारतीय संघ
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 7:37 AM

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड (india vs england) यांच्यातील मँचेस्टरमध्ये आजपासून सुरु होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याआधी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे टीम इंडियाचे सर्व खेळाडू पाचव्या कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे फिट आहेत. कोणत्याही खेळाडूला कोरोना झालेला नाही. सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले आहेत.

बाप्पा पावला, सर्व खेळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

बुधवारी संध्याकाळी भारताचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर भारतीय खेळाडूंना वेगळे ठेवण्यात आले. सर्व खेळाडू त्यांच्या खोल्यांमध्ये बंद होते आणि गुरुवारी कोणीही प्रशिक्षण घेतले नाही. भारतीय खेळाडूंच्या दोन RT-PCR चाचण्या करावल्या लागल्या ज्यात सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले आहेत.

आजपासून पाचवा कसोटी सामना

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारी (10 सप्टेंबर) रोजी सुरु होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली. भारतीय संघाला मोठा झटका बसला असून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षख आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खेळाडूंचे बायो-बबलचे नियम आणकी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं. विशेष म्हणजे खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

या सर्वामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता सर्व खेळाडूंचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे उद्या होणारा पाचवा कसोटी सामना ठरलेल्या वेळेत सुरु होईल. रवी शास्त्री हे 5 सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित आढळले होते. त्याची फ्लो टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर भरत अरुण, आर श्रीधर आणि नितिन पटेल (फिजिओ) यांना विलगीकरणात ठेवलं आहे. त्यानंतर पुन्हा सर्वांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर शास्त्रींसह अरुण आणि श्रीधर हे देखील कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी दरम्यान हे सर्वजण विलगीकरणात असतील. दरम्यान या सर्वांना कोरोनाची लागण ही सामन्यादरम्यान झाली नसून एका खासगी कार्यक्रमामुळे झाली आहे. शास्त्री हे त्यांच्या नव्या पुस्तकाच्या अनावरणासाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये असताना या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. कारण या कार्यक्रमाला बाहेरुन अनेकजण आले होते.

पाचव्या कसोटीला दिग्गज फलंदाज मुकण्याची शक्यता

भारताचा दिग्गज दौऱ्यातील सर्वात यशस्वी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात क्षेत्ररक्षण न करता तंबूत विश्रांती करत होता. रोहितच्या गुडघ्याला थोडी दुखापत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दुखापत अजून वाढू नये यासाठी रोहित विश्रांती घेत आहे. तसंच त्याच्या पायाचा X-Ray ही काढण्यात आला असून त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाही. रिपोर्ट आल्यानंतर नेमकी दुखापत किती आहे? हे कळणार आहे. त्यानंतरच रोहित मॅन्चेस्टरमध्ये होणाऱ्या (Manchester Test) पाचव्या कसोटी सामन्यात खेळेल का? हे स्पष्ट होईल.

इतर बातम्या

T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती

T20 world Cup 2021: टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन दिग्गज खेळाडूंना डच्चू

भारतीय संघात स्थान मिळताच ‘या’ दोन युवा खेळाडूंचा आनंद गगनात मावेना, VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल भारी

(IND vs ENG 5th test : all Indian players have tested Negative covid-19 test)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.