IND vs ENG: चेंडू सोडायचा की, खेळायचा? या दुहेरी विचारात विराटचा घात झाला, पहा VIDEO

IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्यादिवशीच भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. सराव सामन्यात भारतीय फलंदाजांची जी गत झाली होती, तशीच स्थिती आताही आहे.

IND vs ENG: चेंडू सोडायचा की, खेळायचा? या दुहेरी विचारात विराटचा घात झाला, पहा VIDEO
virat-kohli
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 8:09 PM

मुंबई: एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्यादिवशीच भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. सराव सामन्यात भारतीय फलंदाजांची जी गत झाली होती, तशीच स्थिती आताही आहे. एकही फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजीचा आत्मविश्वासाने सामना करत नाहीय. जेम्स अँडरसनने (James Anderson) आपल्या भेदक माऱ्याने भारतीय फलंदाजांना त्रस्त करुन सोडलय. टॉप ऑर्डरने इंग्लिश गोलंदाजांसमोर गुडघे टेकले आहेत. इंग्लंडच्या वातावरणात गोलंदाजांना जास्त लाभ मिळतो. चेंडूला वेग आणि स्विंग मिळतो. त्याचा इंग्लिश गोलंदाज पुरेपूर लाभ उठवताना दिसतायत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत विराट कोहलीकडून (Virat Kohli) सर्वात जास्त अपेक्षा होत्या. पण त्याने निराश केलं. त्याचा खराब फॉर्म कायम आहे. मागच्या दोन वर्षांपासून तो एकही शतक झळकवू शकलेला नाही. आज विराटला युवा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्सने धक्का दिला. हा तोच पॉट्स आहे, ज्याने महिन्याभरापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यु केला आहे.

त्याने अपेक्षा निर्माण केल्या होत्या

लेस्टशायरविरुद्धच्या सराव सामन्यात दुसऱ्याडावात विराटने चांगली फलंदाजी केली होती. त्याने अपेक्षा निर्माण केल्या होत्या. आज बर्मिंघम मध्ये तो संघाला सावरेल, संघाची अडचणीत सापलेली नौका किनाऱ्याला लावेल असं वाटलं होतं. पण असं घडलं नाही. क्रीजवर आल्यानंतर अवघ्या 6 षटकांच्या आत विराट माघारी परतला.

चेंडू सोडायचा की, खेळायचा? अशा दुहेरी विचारात तो फसला

चेतेश्वर पुजारा आऊट झाल्यानंतर विराट कोहली बॅटिंगसाठी मैदानात आला. तो काही चेंडू खेळला होता. तितक्यात पाऊस सुरु झाला. त्यामुळे सामना थांबवण्यात आला. दोन तासानंतर खेळ सुरु झाला. थेट दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला. त्यानंतर काही षटकांमध्येच भारताने आधी हनुमा विहारीला गमावलं. त्यानंतर कोहली. मॅथ्यू पॉट्सने 2 ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या. विराट आपल्या चुकीमुळे आऊट झाला. पॉट्सचा बाहेर जाणारा चेंडू सोडायचा की, खेळायचा? अशा दुहेरी विचारात तो फसला, तिथेच घात झाला.

तो पर्यंत उशीर झाला होता

विराटने चेंडू फ्रंटफुटवर खेळण्याचा प्रयत्न केला. आधी त्याने बचाव करण्याचा निर्णय घेतला. पण शेवटच्या क्षणी त्याने चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला. पण तो पर्यंत उशीर झाला होता. चेंडू वेल लेफ्ट करताना बॅट हवेत होती. पण वेगात असलेला चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागला व थेट स्टम्पसवर आदळला. अशा पद्धतीने विराट आऊट झाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.