IND vs ENG : भारत लॉर्ड्सवर इतिहास रचण्याच्या तयारीत, इंग्लंडवर विजयासाठी 5 विकेट्सची गरज
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आहे. जसप्रीत बुमराहने 2, इशांत शर्माने 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने एक गडी बाद केला आहे.
लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने रहाणे आणि शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर आता इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य असून इंग्लंडने फलंदाजीला सुरुवात केली आहे. मात्र 67 धावांमध्ये त्यांचा निम्मा संघ पव्हेलियनमध्ये परतल्याने हा सामना आता भारताच्या बाजूने झुकला आहे. विशेष म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जो रुटदेखील बाद झाल्याने इंग्लंडच्या या सामन्यातील आशा मावळू लागल्या आहेत. (IND vs ENG : India can defeat England at lords, need 5 more wickets to win after Joe Root dismissal)
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी करत 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड ब्रेक केला. बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत 91 धावांची नाबाद भागीदारी केली. त्याआधी कालच्या दिवशी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (61) आणि चेतेश्वर पुजारा (45) या दोघांनी शतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्यामुळे भारताने आज 8 बाद 298 धावांवर आपला डाव घोषित केला आणि इंग्लंडला 60 षटकांमध्ये 272 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान इंगलंडचा संघ पेलवण्यात असमर्थ ठरतोय असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. कारण भारतीय गोलंदाजांनी 22.3 षटकांमध्ये इंग्लंडची अवस्था 5 बाद 67 अशी केली आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आहे. जसप्रीत बुमराहने 2, इशांत शर्माने 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने एक गडी बाद केला आहे. विशेष म्हणजे ज्या जो रुटवर इंग्लंडची भिस्त आहे. तोदेखील बाद झाला आहे. 23 व्या षटकात जसप्रीत बुमराहने जो रुटला विराट कोहलीकरवी झेलबाद करुन इंग्लंडचा 5 वा गडी तंबूत धाडला आहे. रुटने 33 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे आता हा सामना वाचवणं इंग्लंडसाठी अवघड जाणार आहे. मोईन अली आणि जॉस बटलर सध्या मैदानावर खेळत असून हेदोघेदेखील चाचपडताना दिसत आहेत.
Big Wicket! ? ?@Jaspritbumrah93 scalps his second wicket as captain @imVkohli takes the catch. ? ?#TeamIndia strike right after the Tea interval. ? ?
England 67/5 as Joe Root gets out. #ENGvIND
Follow the match ? https://t.co/KGM2YELLde pic.twitter.com/m0EOOvRkB5
— BCCI (@BCCI) August 16, 2021
इतर बातम्या
टाटांच्या दिलदारपणाला हॅट्सऑफ, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळवणाऱ्या खेळाडूंनाही भारदस्त कार देणार
(IND vs ENG : India can defeat England at lords, need 5 more wickets to win after Joe Root dismissal)