IND vs ENG: पंतच्या शतकानंतर पहिल्यांदाच टीव्हीवर दिसली, द्रविड यांची अशी Reaction, पहा VIDEO

एजबॅस्टन कसोटीत काल इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) ऋषभ पंतने शानदार शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटमधील ऋषभचं हे पाचवं शतक आहे.

IND vs ENG: पंतच्या शतकानंतर पहिल्यांदाच टीव्हीवर दिसली, द्रविड यांची अशी Reaction, पहा VIDEO
pant-dravid
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 9:28 AM

मुंबई: एजबॅस्टन कसोटीत काल इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) ऋषभ पंतने शानदार शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटमधील ऋषभचं हे पाचवं शतक आहे. भारताची 64/3 अशी स्थिती असताना, ऋषभ पंत (Rishabh pant) फलंदाजीसाठी मैदानात आला. तो मैदानात आल्यानंतर विराट कोहली (11) (Virat kohli) आणि श्रेयस अय्यर (15) झटपट बाद झाले. पण त्यानंतरही ऋषभ पंत आपल्या नेहमीच्या शैलीत खेळत राहिला. त्याने कुठेही बचावात्मक पवित्रा घेतला नाही. त्याने गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. इंग्लंडविरुद्ध त्याने तिसर शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लिश भूमीवर ऋषभ पंतच हे दुसरं शतक आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. ऋषभने शतक झळकवल्यानंतर संपूर्ण ड्रेसिंग रुममध्ये चैतन्य निर्माण झालं. सर्वांनीच उभं राहून टाळ्याचा एकच कडकडाट केला. ऋषभच कौतुक केलं.

राहुल द्रविड शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जातात

हेड कोच राहुल द्रविड शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. काल ऋषभने शतक झळकावल्यानंतर त्यांनी जागेवर उभ राहून हात उंचावून जोरदार चिअर केलं. त्यांनाही आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. राहुल द्रविड पहिल्यांदा अशा पद्धतीने व्यक्त होताना दिसले. 98 धावात भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता. अशा स्थितीतून ऋषभ पंतने रवींद्र जाडेजासोबत सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी करुन भारताचा डाव सावरला.

टॉस कोणी जिंकला?

रवींद्र जाडेजा 83 धावांवर नाबाद आहे. पंतला 150 धावांसाठी 4 धावा कमी पडल्या. तिसऱ्यासत्रात ज्यो रुटने त्याला बाद केलं. दिवसअखेर भारताच्या सात बाद 338 धावा झाल्या आहेत. रोहिच्या शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व आहे. बेन स्टोक्सने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. भारताची सुरुवात खराब झाली होती. शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी स्वस्तात बाद होऊन तंबूत परतले होते.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.