IND vs ENG : रुटचं सलग तिसरं शतक, तिघांची अर्धशतकं, दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 345 धावांची आघाडी

इंग्लंडकडून आतापर्यंत या डावात एक शतक तर तीन फलंदाजांनी अर्धशतकं फटकावली आहेत. सलामीवीर रॉरी बर्न्सने 61 धावांची खेळी केली तर हासीब हमीदने 68 धावांची खेळी केली.

IND vs ENG : रुटचं सलग तिसरं शतक, तिघांची अर्धशतकं, दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे 345 धावांची आघाडी
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 11:41 PM

हेडिंग्ले : तिसऱ्या कसोटीची सुरुवातच भारतासाठी खराब झाली. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. पण पहिल्या डावात टीम इंडिया केवळ 78 धावांत गारद झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने भारतीय गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने काल (पहिल्या) दिवसअखेर बिनबाद 12 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. कर्णधार जो रुटच्या शतकी (121) खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 423 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे इंग्लंडला 345 धावांची आघाडी मिळाली आहे. (IND vs ENG: Root’s third consecutive century, three half-centuries, England has 345-run lead)

इंग्लंडकडून आतापर्यंत या डावात एक शतक तर तीन फलंदाजांनी अर्धशतकं फटकावली आहेत. सलामीवीर रॉरी बर्न्सने 61 धावांची खेळी केली तर हासीब हमीदने 68 धावांची खेळी केली. या दोघांनी 135 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मलाने 70 धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जो रुटने या मालिकेतलं सलद तिसरं शतक ठोकलं. त्याने 14 चौकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली. त्यानंतर पुढच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दिवसअखेर क्रेग ओव्हरटन (24) आणि ऑली रॉबिन्सन (0) नाबाद पव्हेलियनकडे परतले.

फलंदाजीसाठी पोषक असल्याने या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी घेतले. भारताला पहिली विकेट त्यानेच मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या. जो रुटला त्यानेच बाद केलं. त्याशिवाय फिरकीपटू रवींद्र जाडेजाने दोन आणि मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. इशांत शर्माला बळींचं खातं उघडता आलं नाही.

भारताचा पहिला डाव

तत्पूर्वी भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

विराट सातव्यांदा अँडरसनचा बळी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 7 धावा करुन कोहली माघारी परतला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) सातव्यांदा विकेट घेऊन, कोहलीला धक्का दिला. विराट कोहली सातत्याने अपयशी ठरत असल्याने टीम इंडियाची फलंदाजी कमकुवत दिसत आहे.

इतर बातम्या

IND vs ENG : रोहितची एक चूक भारताला पडली महाग, तिसऱ्या कसोटीत मोठं नुकसान, पाहा VIDEO

विराट सातव्यांदा अँडरसनचा बळी, कोहलीला खेळताच येईना, गावसकर म्हणाले, आताच्या आता सचिनला कॉल कर!

IND vs ENG : इंग्लंडच्या प्रेक्षकांनी स्कोर विचारत सिराजला चिडवलं, सिराजनेही चोख प्रत्युत्तर देत केलं शांत, पाहा नेमकं काय घडलं?

(IND vs ENG: Root’s third consecutive century, three half-centuries, England has 345-run lead)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.