IND vs ENG ODI: जखमेवर मीठ कसं चोळतात ते पहा; Jasprit Bumrah च्या बायकोने इंग्लंडला दिली अस्सल शालजोडी
IND vs ENG ODI: जसप्रीत बुमराहची पत्नी संजन टीव्ही प्रेजेंटर आहे. तिने ही संधी साधून इंग्लिश संघाची खिल्ली उडवली. सामन्यादरम्यान ती एका फूड कोर्टवर होती. या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबई: भारतीय संघाने मंगळवारी इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) शानदार सुरुवात केली. वनडे सीरीजच्या पहिल्याच सामन्यात भारताने इंग्लंडवर 10 विकेट राखून विजय मिळवला. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाचं सर्वाधिक श्रेय घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच (Jasprit Bumrah) आहे. त्याने वनडे करीयरमधील सर्वोत्तम गोलंदाजी केली. बुमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूंनंतर त्याची पत्नी आणि प्रेजेंटर संजनाने (Sanjana) इंग्लंडच्या जखमेवर मीठ चोळलं. बुमराहने 7.2 षटकाच अवघ्या 19 धावा देत सहा विकेट घेतल्या. टॉपच्या तीन फलंदाजांना खात उघडण्याचीही संधी दिली नाही. जसप्रीत बुमराहची पत्नी संजन टीव्ही प्रेजेंटर आहे. तिने ही संधी साधून इंग्लिश संघाची खिल्ली उडवली. सामन्यादरम्यान ती एका फूड कोर्टवर होती. या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ती ‘डक’ वरुन इंग्लंडच्या संघाला ट्रोल करताना दिसतेय.
मैदानाबाहेरचा डक कसा आहे, ते आम्हाला पहायचय
“फूड कोर्ट आज इंग्लंड टीमच्या फॅन्सनी भरलेला आहे. कारण आज त्यांना मैदानावर जाऊन मॅच पहायची इच्छा नसेल. इथे भरपूर सारी दुकानं आहेत. पण आम्ही अशा ठिकाणी आलोय, जिथे इंग्लिश फलंदाजांना यायला अजिबात आवडणार नाही. या दुकानाच नाव आहे, ‘क्रिस्पी डक’. मी एक ‘डक रॅप’ विकत घेतलाय. मैदानाबाहेरचा डक कसा लागतो, ते आम्हाला पहायच आहे. कारण मैदानावरचे डक खूपच सुंदर होते” असं संजना या व्हिडिओ मध्ये बोलताना दिसते.
While our bowlers bagged some ?s on the field, @SanjanaGanesan ‘wrap’ped up some ?s off the field at #TheOval ?#ENGvIND #SonySportsNetwork pic.twitter.com/SzzQ9dVEaJ
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 12, 2022
चार फलंदाज झीरोवर
इंग्लंडच्या चार फलंदाजांना खातही उघडता आलं नाही. त्यांची टीम 26 षटकात 110 रन्समध्ये ऑलआऊट झाली. काल ओव्हलच्या पीचवर चेंडू स्विंग आणि सीम होत होता. त्याचा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने पुरेपूर फायदा उचलला व सुरुवातीच्या ओव्हर्समध्येच इंग्लंडची वाट लावून टाकली. भारताने हा सामना 18.4 षटकात एकही विकेट न गमावता जिंकला. कॅप्टन रोहित शर्माने 58 चेंडूत नाबाद 76 आणि शिखर धवनने 54 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या.