Ind vs Eng Semi Final : रात्रीस खेळ चाले, पावसाने धोका दिला तर काय होणार? टीम इंडियाच्या पाठिमागे चॅलेंजचं भलंमोठं डोंगर

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. या सामन्यादरम्यान खरंच पाऊस पडला तर सामन्यात काही ओव्हर कमी केल्या जाणार आहेत. पाऊस पडला तर नेमके नियम काय बनवण्यात आले आहेत, याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात.

Ind vs Eng Semi Final : रात्रीस खेळ चाले, पावसाने धोका दिला तर काय होणार? टीम इंडियाच्या पाठिमागे चॅलेंजचं भलंमोठं डोंगर
पावसाने धोका दिला तर काय होणार? टीम इंडियाच्या पाठिमागे चॅलेंजचं भलंमोठं डोंगर
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 4:26 PM

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आज खूप मोठा दिवस आहे. कारण टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपचा सेमीफायनला सामना आज टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना आज रात्री आठ वाजता खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. विशेष म्हणजे टी-ट्वेन्टीचा पहिला सेमीफायनलचा सामना आज सकाळीच पार पडला आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने अतिशय सहजपणे जिंकत थेट फायनलमध्ये मजल मारली आहे. या सामन्यात पाऊस पडला तर या सामन्यासाठी एक विशेष रिजर्व डे ठेवण्यात आला होता. पण दुसऱ्या सेमीफायनलसाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे दुसरा सेमीफायनलचा सामना हा दोन बलाढ्य संघांमध्ये आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी या सामन्यासाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी करो या मरोच्या धर्तीवर असणार आहे. असं असलं तरी आयसीसीने पाऊस पडला तर या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच पाऊस पडला तर ओव्हर कमी करण्याचा नियम देखील घेण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड याच्यातील सेमीफायनलच्या सामन्यासाठी टॉस उडवण्याआधी पाऊस पडला तर सामना सुरु होण्यास वेळ लागू शकतो. या सामन्यासाठी रिजर्व डे नाही. विशेष म्हणजे सेमीफायन आणि फायनल सामन्याच्या दरम्यान केवळ एका दिवसाचा गॅप आहे. याचमुळे या सामन्यासाठी रिजर्व डे ठेवण्यात आलेला नाही. या सेमीफायनलसाठी अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होणार आहे. पण पाऊस आला आणि थांबलाच नाही तर रात्री 12.10 वाजेपासून ओव्हरची संख्या कमी करण्याचा निर्णय होईल.

…तर 10-10 ओव्हरची मॅच होणार

मिळालेल्या माहितीनुसार, या सेमीफायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला तर हा सामना 10-10 ओव्हरचा देखील खेळवला जाऊ शकतो. यासाठी रात्री 1.44 वाजेपर्यंतचा कट ऑफ टाईम ठेवण्यात आला. या व्यतिरिक्त आणखी काही नियम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, टीम इंडियाने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सेमीफायनल जिंकत भारताने फायनलमध्ये जावं आणि तिथे दक्षिण आफ्रिकेलाही धूळ चारावी, अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्यात टीम इंडियाला कितपत यश येतं? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

सेमीफायनलचा सामना झालच नाही तर टीम इंडियाला फायदा

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पावसामुळे 10-10 ओव्हरची मॅचही झाली नाहीत तर भारतीय संघाला मोठा फायदा होणार आहे. कारण पावसामुळे सामना रद्द झाला तर टीम इंडिया थेट अंतिम सामन्यासाठी सिलेक्ट होणार आहे. तिथे टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरोधात लढत होईल. नियमानुसार, सेमीफायनल सामना रद्द झाल्यास पॉईंट टेबलमध्ये टॉपला असणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्याची संधी मिळते. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारतीय संघाला फायनलला जाण्यासाठी दरवाजा खुला असणार आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.