IND vs ENG : उपांत्य फेरीच्या सामन्यात जर तस झालं तर रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी घेतला जाईल निर्णय, काय ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी लढणार आहे. भारत इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. असं असताना आयसीसीने एक बाब निश्चित केली आहे. काय ते जाणून घ्या

IND vs ENG : उपांत्य फेरीच्या सामन्यात जर तस झालं तर रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी घेतला जाईल निर्णय, काय ते जाणून घ्या
Image Credit source: ICC
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 4:32 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. हा सामना गयानाातील प्रोव्हिडन्स मैदानात होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या सामन्यात वारंवार खंड पडू शकतो. इतकंच काय तर सामना रद्द करण्याची वेळ देखील येऊ शकते. अशा स्थितीत आयसीसीने एक बाब निश्चित केली आहे. ती म्हणजे रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी षटकं कमी केली जातील. तिथपर्यंत 20 षटकांचा खेळ पूर्ण होईल असंच यातून स्पष्ट झालं आहे. उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस नसून अतिरिक्त 4 तास 10 मिनिटांचा अवधी दिला आहे. म्हणजेच हा सामना रात्री 8 वाजता सुरु झाला तर वेळेनुसार तीन तासात संपला पाहीजे. म्हणजेच रात्री 3 वाजेपर्यंत हा सामना खेळवला जाईल. पावसाचा खंड पडला तर मग उर्वरित वेळ पाहून रात्री 12.10 मिनिटापासून षटकं कमी केली जातील. जितका अवधी शिल्लक असेल तिथपर्यंत काही षटकं कमी केली जातील. त्यात डकवर्थ लुईस हा नियम दोन्ही संघ दहा षटकं खेळल्यानंतर लागू होईल.

  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल.
  • पाऊस आणि सामन्यात व्यत्यय आल्यास भारतीय वेळेनुसार 12.10 वाजेपर्यंत एकही षटक कापला जाणार नाही. रात्री 12.10 मिनिटानंतर दर पाच मिनिटांनी एक षटके कमी केलं जाईल.
  • कमी षटकांचा सामना पूर्ण करण्यासाठी किमान 10 षटकांचा सामना खेळला जाणे आवश्यक आहे. म्हणजेच आयसीसीच्या नवीन नियमांनुसार उपांत्य फेरीतील निकाल ठरवण्यासाठी प्रत्येकी दहा षटकांचा डाव खेळावा लागेल.
  • प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 20 षटके खेळली असतील, तर दुसऱ्या डावात डकवर्थ-लुईस नियमानुसार निकाल निश्चित करण्यासाठी किमान 10 षटकांचा सामना आवश्यक आहे.
  • बाद फेरीतील निकाल ठरवण्यासाठी पाच षटकांचा सामना किंवा सुपर ओव्हर्स खेळवली जाणार नाही, असे आयसीसीने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, सामना बरोबरीत सुटला तर फक्त सुपर ओव्हर खेळवली जाईल.
  • षटकांची कट ऑफ वेळ 12.10 वाजल्यापासून आहे. म्हणजेच 10 षटकांचा सामना करायची शेवटची वेळ ही 1.44 मिनिटांची आहे. यानंतर दहा षटकं होऊ शकत नाहीत. त्यामुळे मैदानातील पंच आणि सामनाधिकारी चर्चा करून सामना रद्द करतील.
  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर पॉइंट टेबलमध्ये अव्वल असलेल्या टीम इंडियाचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित आहे.

प्रोव्हिडन्स स्टेडियमची खेळपट्टी ही सर्वात मोठं गूढ आहे. पॉवर प्लेमध्ये रनरेट 6.4 असतो, मधल्या षटकात 5.5 पर्यंत घसरतो आणि डेथ ओव्हरमद्ये 7.6 पर्यंत पोहोचतो. या मैदानावर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले होते. न्यूझीलंडला 84 धावांनी पराभूत केलं होतं. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ फक्त 75 धावा करू शकला होता. 2022 वर्ल्डकप उपांत्य फेरीच्या कटू आठवणी भारतासोबत आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताला 10 गडी राखून पराभूत केलं होतं.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज , यशस्वी जयस्वाल.

इंग्लंड संघ: फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली, मार्क वुड, बेन डकेट, विल जॅक्स, टॉम हार्टले.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.