ind vs eng : इंग्लंडने सामना कुठे गमावला, कॅप्टन जोस बटलर स्पष्टच म्हणाला….

IND vs ENG Semi Final : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये इंग्लंड संघाचा 68 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने 10 वर्षानंतर फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडने सामना नेमका कुठे गमावला याबाबत बटलर काय म्हणाल जाणून घ्या.

ind vs eng : इंग्लंडने सामना कुठे गमावला, कॅप्टन जोस बटलर स्पष्टच म्हणाला....
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 2:46 AM

टी-20 वर्ल्ड कपमधील सेमी फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने इंग्लंड संघावर 68 धावांनी दमदार विजय मिळवला. पावसाने खोडा घातला त्यामुळे सामना सुरू होण्यासाठी वेळ लागला होता. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. तर फलंदाजासाठी उतरलेल्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 171-7  धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाचा डाव 103 धावांवरच आटोपला. टीम इंडियाच्या स्पिनर्सने इंग्लिश बॅट्समनचा बाजार उठवला. इग्लंड संघाकडून फक्त हॅरी ब्रूक याने सर्वाधिक 25 धावा केल्या. मात्र इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंड संघाच्या पराभवावर बोलताना कर्णधार जोस बटरल याने सामना कुठे गमावला हे सांगितलं.

टीम इंडियाने 20 ते 25 धावा जास्त केल्या. पिच हे खूप आव्हानात्मक होतं पण टीम इंडियाने दर्जेदार खेळ केला त्यामुळे विजयासाठी पात्र आहेत. 2022 आणि आताची परिस्थिती खूप वेगळी होती. पाऊस असल्याने आम्ही जास्त काही बदल केले नाहीत. टॉस जिंकला किंवा हरल्याने जास्त काही फरक पडत नाही. जर आपण पाहिलं तर टीम इंडियाकडे खूप चांगले स्पिनर आहेत. आम्ही एकजुटीने संपूर्ण स्पर्धेत खेळलो पण आज आम्ही थोडे कमी पडलोत. मात्र टीममधील प्रत्येकाने केलेल्या प्रयत्नाचा मला अभिमान असल्याचं जोस बटलर म्हणाला.

सामन्याचा धावता आढावा

जोस बटरल याने टॉस जिंकत टीम इंडियाला फलंदाजासाठी आमंत्रित केलं होतं. टीम इंडियानेही आव्हानात्मक पिचवर 20 ओव्हरमध्ये 171-7 धावा केल्या. रोहित शर्माने सर्वाधिक 57 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला इंग्लंड संघ 16.4 ओव्हरमध्ये 103 वर ऑल आऊट झाला. टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.