IND vs ENG: रोहित-सूर्याची शानदार खेळी, इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान

India vs England Semi Final: कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने टीम इंडियासाठी 73 धावांची निर्णायक भागीदारी केली.

IND vs ENG: रोहित-सूर्याची शानदार खेळी, इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान
suryakumar yadav and rohit sharmaImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 12:29 AM

कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर इंग्लंडला 172 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने अर्धशतक झळकावलं. हिटमॅनने 57 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमारने 47 धावांचं योगदान दिलं. तर इंग्लंडकडून 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी 5 जण यशस्वी ठरले. चौघांनी 1-1 विकेट घेतली. तर ख्रिस जॉर्डन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाची अपेक्षित सुरुवात झाली नाही. विराट कोहली टीम इंडियाच्या 19 धावा असताना 9 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर ऋषभ पंत 4 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 2 बाद 40 अशी झाली. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला आणि चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.या दोघांनी 73 धावांची भागीदारी केली. या दरम्यान रोहितने 32 वं अर्धशतक ठरलं. मात्र त्यानंतर रोहित आणि सूर्या ही सेट जोडी झटपट आऊट झाली. रोहित 57 आणि सूर्या 47 धावा करुन माघारी परतले. त्यानंतर रवींद्र जडेजाने नाबाद 17 धावा जोडल्या. हार्दिक पंड्याने 23 रन्स केल्या. अक्षर पटेलने 10 धावा केल्या. तर अर्शदीप सिंहने 1* धाव केली.

इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन याच्याशिवाय रिसे टॉपली, जोफ्रा आर्चर, सॅम करन आणि आदिल रशीद या चौघांनी 1-1 विकेट घेतली. आता इंग्लंडनंतर टीम इंडियाचे गोलंदाज कशी बॉलिंग करतात, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंडसमोर 172 रन्सचं टार्गेट

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपले.

Non Stop LIVE Update
आतापर्यंत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरणारे 'हे' प्रतिभावंत भारतीय कॅप्टन्स
आतापर्यंत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरणारे 'हे' प्रतिभावंत भारतीय कॅप्टन्स.
T20 विश्वचषक जिंकल्यानंतर मोदींनी थेट शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले...
T20 विश्वचषक जिंकल्यानंतर मोदींनी थेट शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले....
'हा माझा शेवटचा...', T20 विश्वचषक जिंकला अन् रोहित शर्माची मोठी घोषणा
'हा माझा शेवटचा...', T20 विश्वचषक जिंकला अन् रोहित शर्माची मोठी घोषणा.
वर्ल्डकप जिंकलो रे...जय हो...T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा कोरल भारतान नाव
वर्ल्डकप जिंकलो रे...जय हो...T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा कोरल भारतान नाव.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.