‘फक्त विराट कोहलीच हे करु शकतो’, बीसीसीआय अध्यक्ष Sourav Ganguly चं मोठं विधान
विराट कोहलीचा (Virat Kohli) सध्या खराब काळ सुरु आहे. जागतिक क्रिकेट मधील हा अव्वल फलंदाज धावांसाठी झगडतोय. त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी होतेय. पु
मुंबई: विराट कोहलीचा (Virat Kohli) सध्या खराब काळ सुरु आहे. जागतिक क्रिकेट मधील हा अव्वल फलंदाज धावांसाठी झगडतोय. त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी होतेय. पुढच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) दौऱ्यासाठी त्याला विश्रांती देण्यात येणार आहे. या कठीण काळात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) मागचा सगळा वाद विसरुन विराटच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. “कोहली सध्या ज्या परिस्थितीतून जातोय, त्याच परिस्थितीतून मी, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सुद्धा गेलो आहोत” असं सौरव गांगुली म्हणाला.
खेळामध्ये अशा गोष्टी घडत असतात
“खेळामध्ये अशा गोष्टी घडत असतात. प्रत्येकासोबत असं घडतं. सचिन सोबत हे घडलं. राहुलही या स्थितीतून गेलाय. माझ्याबरोबरही असं झालय. आता कोहली बरोबर हे घडतय. भविष्यातही काही खेळाडूंसोबत हे घडेल. खेळाचा हा एक भाग आहे. हे काय चाललय, त्या बद्दल खेळाडू म्हणून तुम्ही जागरुक असलं पाहिजे. तुम्ही फक्त मैदानावर जाऊन तुमचा खेळ खेळा” असं सौरव गांगुली म्हणाला.
त्याला त्याचा मार्ग शोधावा लागेल
“आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील तुम्ही विराट कोहलीचे आकडे बघा, क्षमता आणि दर्जा असल्याशिवाय तुम्ही अशी कामगिरी करु शकत नाही. हो, त्याचा कठीण काळ सुरु आहे, त्याबद्दल त्याला माहित आहे. त्याला त्याचा मार्ग शोधून यशस्वी बनावं लागेल” असं गांगुलीने सांगितलं.
#WATCH | London, UK | Look at the numbers he (Virat Kolhi) has got in international cricket, that doesn’t happen without ability & quality. Yes, he has had a tough time & he knows that, he has been a great player himself: BCCI president Sourav Ganguly on Virat Kohli’s poor form pic.twitter.com/RMqDYsnbKq
— ANI (@ANI) July 13, 2022
फक्त विराट कोहलीच हे करु शकतो
“विराट कोहली एक महान खेळाडू आहे. त्याला त्याचे मापदंड माहित आहेत. तो फॉर्म मध्ये येईल आणि चांगली कामगिरी करेल. पण त्याला त्याचा मार्ग शोधून यशस्वी बनावं लागेल. मागच्या 12-13 वर्षांपासून तो चांगली कामगिरी करतोय, फक्त विराट कोहलीच हे करु शकतो” असं सौरव गांगुली म्हणाला.