IND vs ENG T20 WC : स्मृती मांधनाचा झुंजार खेळ, जिंकलेली मॅच टीम इंडिया कशी हरली?, ‘या’ 5 चुका महाग पडल्या

IND vs ENG T20 WC : टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाची हॅट्रिक करेल, असं सर्वांना वाटलं होतं. पण हे काम इंग्लंडच्या टीमने केलं.

IND vs ENG T20 WC : स्मृती मांधनाचा झुंजार खेळ, जिंकलेली मॅच टीम इंडिया कशी हरली?, 'या' 5 चुका महाग पडल्या
Smirti mandhana
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 8:23 AM

IND vs ENG T20 WC : भारताच्या महिला टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या दोन सामन्यात सरस प्रदर्शन केलं. तसाच खेळ टीम इंडियाला शनिवारी दाखवता आला नाही. इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव झाला. टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाची हॅट्रिक करेल, असं सर्वांना वाटलं होतं. पण हे काम इंग्लंडच्या टीमने केलं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा इंग्लंड विरुद्ध हा सहावा पराभव आहे. महिला टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनपर्यंत एकदाही इंग्लंडला हरवता आलेलं नाहीय.

टीम इंडियाकडून दोघी जबरदस्त खेळल्या

इंग्लंडच्या टीमने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. पूर्ण 20 ओव्हर खेळल्यानंतर सात विकेट गमावून त्यांनी 151 धावा केल्या. टीम इंडिया 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावून 140 धावांपर्यंत पोहोचू शकली. टीम इंडियाकडून स्मृती मांधनाने सर्वाधिक 41 चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. तिच्याशिवाय ऋचा घोषने 34 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. टीम इंडियाने हा सामना का गमावला? त्याची कारण जाणून घेऊया.

  1. हरमनप्रीतने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 29 धावात तीन विकेट गमावल्या होत्या. पण टीम इंडियाला या सुरुवातीचा फायदा उचलता आला नाही. मधल्या ओव्हरर्समध्ये टीम इंडियाने धावा दिल्या. त्यामुळे इंग्लंडची टीम 150 धावांपर्यंत पोहोचू शकली.2
  2. टीम इंडियाच्या फलंदाजांना विकेटवर पाय रोवण्याची गरज होती. पण ते बाद होत गेले. या मॅचमध्ये टीम इंडियाकडून स्मृती मांधना आणि ऋचा घोषशिवाय कोणाची चांगली भागीदारी झाली नाही. त्याची किंमत टीमला चुकवावी लागली.
  3. मांधनाने चांगला खेळ दाखवला. तिने अर्धशतक झळकावल होतं. पण ती चुकीच्यावेळी बाद झाली. त्यामुळे टीमच नुकसान झालं. मांधना शेवटपर्यंत टिकली असती, तर निकाल भारताच्या बाजूने लागला असता.4
  4. मांधना आऊट झाल्यानंतर ऋचा घोष एकटी लढली. अन्य खेळाडूंमध्ये विजयाची ती इच्छा दिसली नाही. ऋचाने उशिराने आक्रमक बॅटिंग सुरु केली. ती आधीच आक्रमक क्रिकेट खेळली असती, तर टीम इंडियाचा विजय झाला असता.
  5. क्रिकेटमध्ये मैदानात वेगाने धाव पळणं गरजेच असतं. या मॅचमध्ये टीम इंडियाची हीच कमजोरी दिसली. अनेकदा दोन रन्स काढण्याची संधी होती. पण एकच धाव पळून काढली. हे सुद्धा पराभवाच एक कारण आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.