IND vs ENG | विराट कोहली याची तडाकाफडकी माघार, नक्की कारण काय?
Virat Kohli | टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मोठा झटका लागला आहे. विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून अचानक आपलं नाव मागे घेतलं आहे.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडचं नेतृत्व आहे. टीम इंडियाने पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. पहिला सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाचा अनुभवी आणि माजी कर्णधार असलेला फलंदाज विराट कोहली याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. विराटने अचानक अशी माघार घेतल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली आहे.
विराटने त्याला पहिल्या 2 सामन्यांसाठी मुक्त करावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार बीसीसीआयने विराटची ही विनंती मान्य केली आहे. विराटने आतापर्यंत देशाचं प्रतिनिधित्वाला प्राधान्य दिलं आहे. मात्र आता त्याला वैयक्तिक कारणांमुळे विश्रांती देण्यात आली आहे. विराटने कोणत्या कारणासाठी विश्रांती घेतली यांचा माध्यमांनी आणि चाहत्यांनी अंदाज बांधू नये. विराटच्या वैयक्तिक निर्णयाचा आदर करा, असं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
टीम इंडियाला मोठा झटका
🚨 NEWS 🚨
Virat Kohli withdraws from first two Tests against England citing personal reasons.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENGhttps://t.co/q1YfOczwWJ
— BCCI (@BCCI) January 22, 2024
विराटच्या जागी कोण?
आता विराट पहिल्या 2 कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध टीम इंडियात विराटच्या जागी कुणाला संधी मिळणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. विराटच्या जागी कुणाला जागा मिळणार याची घोषणा आम्ही लवकरच करु, असं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. आता बीसीसीआय निवड समिती विराटच्या जागी कुणाची वर्णी लावते, याकडे लक्ष असणार आहे.
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.