IND vs ENG Test: ‘कोहली अश्विनला संघात स्थान देत नव्हता, त्यावेळी सगळे राग काढायचे, मग आता शांत का?’
IND vs ENG Test: फिरकी गोलंदाजीचा भार रवींद्र जाडेजावर आहे. रवीचंद्रन अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजाला वगळण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाही. त्यांनी टि्वटरवरुन आपला संताप व्यक्त केला.
मुंबई: भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) एजबॅस्टन येथे 5 वा कसोटी सामना सुरु आहे. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनफिट असल्यामुळे भारताकडून जसप्रीत बुमराह कर्णधारपद भूषवत आहे. मागच्यावर्षीच्या कसोटी मालिकेत एक सामना बाकी राहिला होता. तो आता खेळला जात आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत चार सामने झाले आहेत. भारत या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. 15 वर्षांनी भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. भारताने या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघात रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) स्थान दिलेलं नाही. भारताने या कसोटीसाठी टीम मध्ये वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिलं आहे. चार फास्ट बॉलर टीम मध्ये आहेत.
मग आता सगळे शांत का?
फिरकी गोलंदाजीचा भार रवींद्र जाडेजावर आहे. रवीचंद्रन अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजाला वगळण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाही. त्यांनी टि्वटरवरुन आपला संताप व्यक्त केला. अश्विनला न खेळवल्याबद्दल टि्वट युजर्सनी हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन जसप्रीत बुमराहवर आपला राग काढलाय. अश्विनला न खेळवण्यासाठी कारस्थान रचल जातय, असा आरोप करण्यात आला आहे. कोहली अश्विनला संघात निवडायचा नाही, त्यावेळी सगळे संताप व्यक्त करायचे, मग आता सगळे शांत का? असा सवाल एक टि्वटर युजरने विचारलाय.
When Kohli didn’t select Ashwin, there was outrage. Why all are silent now?
— Sai Krishna? (@SaiKingkohli) July 1, 2022
Jadeja ahead of Ashwin & this what balanced the XI.!Hope those who were reporting those ego problem between Ashwin & Kohli will understand it.!
— Deep Point (@ittzz_spidey) July 1, 2022
फलंदाजीतही तो तितकाच उपयुक्त
रविचंद्रन अश्विन भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. 435 पेक्षा जास्त विकेट त्याने काढल्या आहेत. आपल्या गोलंदाजीत तो नेहमी विविध प्रयोग करत असतो. गोलंदाजी बरोबर फलंदाजीतही तो तितकाच उपयुक्त आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये अश्विनला फलंदाजीसाठी वरती पाठवायचे. पण काही वेळा परिस्थिती, खेळपट्टीनुसार निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळेच अश्विनला संघात स्थान दिलेलं नाहीय.
Can’t see boomer uncles tweets bashing bumrah – dravid and creating conspiracy theories for not playing ashwin
— A (@_shortarmjab_) July 1, 2022
Feel for R Ashwin.Why take him all the way if you are not going to play him in the eleven? He could have played in the TNPL,at least. Against an aggressive English batting, esp.Stokes & Bairstow, he could have been valuable. New coach. New captain. Same treatment. Sad. #Ashwin
— Ashwin Murali (@ashwinmurali) July 1, 2022
अशी आहे भारताची प्लेइंग -11
भारतीय संघ – जसप्रीत बुमराह (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज,