IND vs ENG: लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर विराट कोहली सुद्धा कोविड Positive होता, पण….

IND vs ENG: मात्र त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना कोविड 19 पासून काळजी घ्यावी लागणार आहे. आता बायो बबलचा नियम नाहीय. त्यामुळे जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

IND vs ENG: लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर विराट कोहली सुद्धा कोविड Positive होता, पण....
विराट कोहलीImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 1:06 PM

मुंबई: कसोटी सामन्यापासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला (India England Tour) सुरुवात होत आहे. 1 जुलैपासून एजबॅस्टनमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामना सुरु होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना कोविड 19 पासून काळजी घ्यावी लागणार आहे. आता बायो बबलचा नियम नाहीय. त्यामुळे जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण एखाद्या खेळाडूला किंवा सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली, तर त्याचा संपूर्ण संघाला फटका बसू शकतो. भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनही (Ravichandran Ashwin) करोनाने ग्रस्त आहे. त्यामुळे तो इंग्लंड दौऱ्यावर अजून जाऊ शकलेला नाही. आता टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीला (Virat Kohli) सुद्धा कोविडची बाधा झाली होती. भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहली लंडनमध्ये पोहोचला, त्यावेळी तो कोविड पॉझिटिव्ह होता. “मालदीव वरुन सुटट्यांवरुन परतल्यानंतर विराट कोहलीला कोरोनाची लागण झाली होती. पण आता तो त्यातून बरा झाला आहे” असं सूत्रांच्या हवाल्याने वृत्त देण्यात आलं आहे.

त्याच्या ट्रेनिंगचे फोटोही शेअर केले

विराट कोविडमधून सावरला हे चांगलं लक्षण आहे. भारत मागच्यावर्षी सीरीजमध्ये बाकी राहिला कसोटी सामना खेळणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. विराट कोहली इंग्लंडमध्ये सराव करतोय, विराटने त्याच्या ट्रेनिंगचे फोटोही शेअर केले आहेत. त्यात त्याने ‘चांगला सराव करा, आनंदी रहा’ असा मेसेज दिलाय.

रोहित-विराटने मास्क घातलं नव्हतं

लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली तिथल्या रस्त्यांवर फिरताना दिसले. शॉपिंगसाठी म्हणून ते बाहेर पडले होते. यावेळी चाहत्यांनीही त्यांच्यासोबत फोटो काढले. रोहित आणि विराट दोघांनी मास्क घातलं नव्हतं. त्यावर बीसीसीआयने चिंता व्यक्त केली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धूमल यांनी या मुद्दावर खेळाडूंशी चर्चा करण्यात येईल, असं सांगतिलं. ब्रिटनमध्ये कोविडचा धोका कमी झालाय. मात्र, तरीही खेळाडूंनी खबरदारी घेणं आवश्यक आहे, असं अरुण धूमल इनसाइट स्पोर्टशी बोलताना म्हणाले.

लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.