IND vs ENG | रोहित-सूर्या नहीं, टीम इंडियाच्या ‘या’ दोन फलंदाजांनी पाकिस्तान दाखवलं कशी बॅटिंग करायची
IND vs ENG WC 2023 | टीम इंडियाने काल इंग्लंड विरुद्ध शानदार विजय मिळवला. वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने विजयाचा षटकार मारलाय. महत्त्वाच म्हणजे टीम इंडियाने सलग 6 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाच्या या विजयात गोलंदाजांच श्रेय जास्त आहे. कॅप्टन रोहित शर्मा-सूर्यकुमार यादव सुद्धा जबरदस्त खेळले. पण त्यांच्याशिवाय आणखी दोघांनी पाकिस्तानला शिकवलं बॅटिंग कशी करायची असते.
लखनऊ : टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये एक सुंदर विजय मिळवला. रविवारी लखनऊमध्ये टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध 100 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. इंग्लंड विरुद्ध जिंकलो, पण पहिली फलंदाजी करताना विजय मिळवला हे महत्त्वाच आहे. टीम इंडिया याआधी पाचही सामन्यात धावांचा पाठलाग करताना जिंकली होती. आता टीम इंडियाने पहिली बॅटिंग करुनही विजय मिळवला. या मॅचमध्ये टीम इंडियाने फक्त इंग्लंडलाच हरवलं नाही, तर पाकिस्तानलाही धडा शिकवला. लखनऊमध्ये टीम इंडियाला पहिली फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतराव लागलं. सहाजिकच फॅन्सपासून एक्सपर्ट्स पर्यंतच्या नजरा यावर होत्या. कारण सेमीफायनल आणि फायनल या महत्त्वाच्या सामन्याआधी पहिली बॅटिंग करताना टीम इंडिया कशी खेळते? हे महत्त्वाच होतं. टीम इंडिया या पहिल्या टेस्टमध्ये यशस्वी ठरली. टीमने फलंदाजी नाही, गोलंदाजीच्या बळावर हा विजय मिळवला. म्हणजे फलंदाजीबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे.
टीम इंडियाकडून टॉप ऑर्डरमध्ये एकट्या रोहित शर्माने 87 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने झुंझार 49 धावा केल्या. केएल राहुलने जम बसवला होता. पण तो आऊट झाला. विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा पूर्णपणे अपयशी ठरले. टीम इंडियाने 9 विकेट गमावून 229 धावा केल्या. रोहित-सूर्याची फलंदाजी प्रभावी ठरली. पण त्याशिवाय आणखी एक गोष्ट महत्त्वाची होती. टीम इंडिया 5 गोलंदाजांसह हा सामना खेळत होती. यात 4 पूर्णवेळ गोलंदाज होते. म्हणजे टीम इंडियाच शेपटू मोठं होतं. त्याचा परिणाम स्कोरबोर्डवर दिसून आला. खास बाब म्हणजे 42 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावूनही टीम इंडिया ऑलआऊट झाली नाही. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने 22 चेंडूत 21 धावांची भागीदारी केली.
अशी कामगिरी फक्त टीम इंडियाची
या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच एकमेव असा संघ आहे, जो एकदाही ऑलआऊट झालेला नाही. टीम इंडियाकडून कुलदीप आणि बुमराहने मिळून पाकिस्तानसमोर उदहारण ठेवलं. कारण पाकिस्तानने या वर्ल्ड कपमध्ये 6 पैकी 5 सामन्यात एकदाही 50 ओव्हर फलंदाजी केलेली नाही. फक्त एका सामन्यात पाकिस्तानी टीम 50 ओव्हर्सच्या आधी जिंकली होती. पण 4 वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. …तर कदाचित पाकिस्तानने हा सामना जिंकला असता
पाकिस्तानी टीमवर यावरुन बरीच टीका होतेय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मागच्या सामन्यात बाबर आजमच्या टीमने 270 धावा केल्या. पण पाकिस्तानी टीम 46.4 ओव्हर्सवर ऑलआऊट झाली. म्हणजे त्यांच्याकडे अतिरिक्त 20 चेंडू होते. त्यावर धावा केल्या असत्या, तर कदाचित पाकिस्तानने हा सामना जिंकला असता. पाकिस्तानचे प्रमुख फलंदाज याला जितके जबाबदार आहेत, तितकाच लोअर ऑर्डर सुद्धा जबाबदार आहे. लखनऊमध्ये कुलदीप आणि बुमराहने पाकिस्तानसमोर एक उदहारण ठेवलय.